प्रतापने आईला दिली प्रेमाची कबुली!!!

725

पुणे प्रतिनिधी

नेहमीच दर्जेदार मालिका आणि कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणारी ‘झी युवा’ ही वाहिनी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. विविध मालिका विषयावरील उत्तमोत्तम मालिका प्रेक्षकांना या वाहिनीवर पाहायला मिळतात. रमा आणि प्रताप यांची प्रेमकहाणी असलेली ‘साजणा’ ही मालिका सुद्धा अत्यंत लोकप्रिय आहे. या दोघांचे निखळ आणि सोज्वळ प्रेम प्रेक्षकांना आवडलेले असले, तरीही घरच्यांपासून हे प्रेम लपवून ठेवण्याची दोघांची धडपड अजूनही सुरू आहे.
मुख्य भूमिकेत असलेले पूजा बिरारी आणि अभिजित श्वेतचंद्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत. आपलं नातं घरच्यांना कळू नये म्हणून प्रताप आणि रमाची सुरू असलेली धडपड आणि उडणारी तारांबळ यामुळे सगळ्यांचे खूप मनोरंजन होते आहे. गेल्या काही दिवसात हे प्रेम अधिकाधिक फुलत असलेले प्रेक्षकांनी पाहिले आहे. पण, या प्रेमाच्या प्रवासात एक मोठा अडथळा उभा ठाकला आहे. प्रतापची आई वसुंधरा आणि मावशी शालिनी यांनी त्याच्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. तिच्याशी प्रतापने लग्न करावं, अशी दोघींची मनापासून इच्छा आहे. या लग्नाविषयीचा त्यांचा उत्साह पाहून अखेर प्रताप गोंधळून जातो. इतके दिवस लपवून ठेवलेलं रमासोबतचं नातं, अखेर तो आईला सांगतो. त्यांच्या प्रेमाविषयी ऐकून वसुंधरा, म्हणजेच प्रतापची आई खुश होते. पण, त्याचे बाबा हे प्रेम मान्य करतील का, याची धास्ती सुद्धा तिला वाटते. त्यांच्या प्रेमकथेतील या संभाव्य धोक्याविषयी आई त्याला आठवण करून देते. त्यांच्या या प्रेमाला मिळत असलेले नवे वळण त्यांच्यासाठी यापुढच्या काळात काय काय घेऊन येईल, हे जाणून नक्की पाहत रहा, ‘साजणा’; ‘झी युवा’ वर, सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ वाजता!!