सविता मस्केना मिळणार केज मधुन भाजपा उमेदवारी

846

केज प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील रेवकी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सविताताई बाळासाहेब मस्के यांना भाजपाकडून केज विधानसभा मतदार संघाची उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कार्यक्षम व विकासाची दुरदृष्टी असलेल्या सविताताई मस्के यांनी जिल्हा परिषद मध्ये देखील एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय सविताताई मस्के या केजच्या कन्या असून आपल्या कर्तत्वावर त्यांनी मतदार संघातील जनतेच्या मनावर छाप पाडली आहे. त्यामुळे कर्तत्वशील नेतृत्व व विकासाची दुरदृष्टी असलेल्या तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या विश्वासू शिलेदार सविताताई मस्के यांच्याच गळ्यात भाजपची उमेदवारीची माळ पडणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
बीड जिल्ह्यात आगामी विधानसभेचे वारे जोरात वाहत आहे. भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या आहेत. केज मतदार संघातून भाजपच्या विद्यमान आमदार संगिताताई ठोंबरे, सविताताई मस्के, बाळासाहेब मस्के यांच्यासह सात जणांनी मागच्या आठवड्यात पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या आहेत. यामुळे आगामी विधानसभेची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे येथील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान विद्यमान आमदार संगिताताई ठोंबरे यांनी पाच वर्षात मतदारांकडे पाठ फिरवल्याने त्यांच्या उमेदवारीवर मतदारातून नाराजीचा सूर निघत आहे. त्यातच भाजपचा मित्र पक्ष असलेला मित्र पक्ष शिवसेनेनेदेखील संगिताताई यांना परत उमेदवारी दिल्यास काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे. तसेच सुतगिरणी प्रकरणी देखील कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर बनली असून केजच्या कन्या सविताताई मस्के यांचे नाव चर्चेत आले आहे. भाजपाच्या गेवराई तालुक्यातील रेवकी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या असलेल्या सविताताई मस्के यांनी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून गटांतर्गत विविध विकासकामे करुन जनतेच्या समस्या मार्गी लावल्या आहेत. विकासकामे करत असताना कामाचा दर्जा त्यांनी जोपासला असून मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. शिवाय पंकजाताई मुंडे यांच्या विश्वासू शिलेदार तथा केजच्या कन्या, कार्यकर्त्यांचे मोठे संघटन, केज मतदार संघातील स्थानिक नेत्यांची सविताताई यांच्याच नावाला सहमती या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यातच सविताताई व त्यांचे पती बाळासाहेब मस्के यांनी जन्मभूमी असलेल्या केज मतदार संघात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून तसेच मतदारांचे मोठे संघटन करुन पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधलेले आहे. त्यामुळे आपल्या दुरदृष्टी व विकसनशील नेतृत्व गुणावर भाजप पक्षश्रेष्ठीं आगामी विधानसभेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या केज विधानसभेच्या जागेवर सविताताई मस्के यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

पक्षनिष्ठा फळाला येणार
सविताताई मस्के यांचे पती यांचे पती बाळासाहेब मस्के हे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. ते नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिलेले असून सामाजिक कार्यात त्यांचा हिरारीने सहभाग असतो. तसेच युवकांची मोठी फळी व पक्ष संघटन करण्याची ताकद असल्यानेच भाजपाने त्यांना राज्य कार्यकारणीवर घेतले होते. दरम्यान दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना दैवत मानुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ.योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब मस्के यांनी मोठ्या ताकदीने भाजपाचे विचार जनसामान्यांत पोहचविण्याबरोबरच पक्ष वाढीसाठी मोठे संघटन करून परिश्रम घेतले आहेत. यामुळे त्यांची पक्षनिष्ठा केज मतदार संघाच्या उमेदवारीची माळ त्यांच्या सौभाग्यवती सविताताई मस्के यांच्या गळ्यात पडून फळाला येणार असल्याचे बोलले जात आहे.