गार्डन समोर वाहने लावल्याने नागरिकांना त्रास

669

कोंढवा प्रतिनिधी

कोंढवा खुर्द मधील शहीद अब्दुल हमीद गार्डन समोर दुचाकी वाहने लावल्याने नागरिकांना गार्डन मध्ये आत जाताना मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागत असून येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी दररोज व्यायामाला येणाऱ्या नागरिकांनी मनपा प्रशासनास केली आहे.

शहीद अब्दुल गार्डन मध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर व्यायाम, फिरण्यासाठी येत असतात. या गार्डनमध्ये सुविधा असून येथे पादचारी मार्गावरील ब्लॉक खराब झालेले असून काही ठिकाणी ते वर खाली झालेले आहेत, त्यामुळे चालणाऱ्या नागरिकांना सावधपणे चालावे लागते.
येथे ओपन जिम असून ओपन जिम मधील आणखी साहित्यांची मागणी नागरिक करत आहेत.
नागरिकांचा मोठया प्रमाणात वावर असल्याने आणि पार्किंग साठी जागा कमी असल्याने नागरिक आत मध्ये जाणाऱ्या गेट समोर वाहने लावत असल्याने आत जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला जावे लागत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन येथे सुरक्षारक्षक नेमून अडचणी दूर कराव्यात अशी मागणी अभिमन्यू पाटील, सुरेश काकडे, धर्मराज पवार, शाहू , दादा रणदिवे, भरत टोंपे यांनी केली आहे.