जागतिक ह्रदयदिनानिमित्त “अलोहा” वॉकेथॉनचे आयोजन

543

अनिल चौधरी ,पुणे

जागतिक ह्रदयदिनाच्या पार्शवभूमीवर अलोहा क्लिनिक तर्फे जागतिक ह्रदयदिनानिमित्त अलोहा क्लिनिक तर्फे वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ऑलंपीक विजेता अभिजित कुंटे आणि ऑलंपीक विजेते पराग पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या वॉकेथॉनचे उद्घाटन करण्यात आले आणि वॉकेथॉन सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांसह तरुण-तरुणी, ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग घेतला होता. सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या या “अलोहा वॉकेथॉन” मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतला. डॉ. ऋतुपर्ण शिंदे कार्डीओलॉजिस्ट , डायबेटॉलॉजिस्ट आणि ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.अश्विनी जोशी,  आसावरी पागे कार्डियाक तज्ञ यांनी या अलोहा वॉकेथॉनचे आयोजन केले होते.


यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.अश्विनी जोशी म्हणाल्या कि, ह्रद्य हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. ह्रदयविकार हा शब्द उच्चारला तरी धडकी भरते.मात्र नियमित उपचार व काळजी यातून ह्रदयाचे आरोग्य चांगले ठेवून आंनदी जीवन जगता येते. ह्रदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी दररोज व्यायाम व आहार नियंत्रण करून ह्रदयरोगावर मात करता येते असेही त्या यावेळी म्हणाल्या.
अलोहा या कार्डियाक आणि डायबेटिज क्लिनिक मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अँजिओग्राफी आणि ऍन्जोप्लाटी या आजारांवरील उपचार विना शस्त्रक्रिया द्वारे करून पेशन्ट निरोगी आयुष्य जगत आहेत.
याप्रसंगी जोरात चालण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच अलोहा क्लिनिकचे कर्मचारी नागरिक सूर्यनमस्कार ग्रुपचे भरत टोणपे, दादा रणदिवे, ,हनुमंत लोणकर, धनंजय पडवळ, विजय थोरात, सुरेश काकडे, धर्मराज पवार, जया शिंदे, यादव, नितीन धोत्रे, हेमराज भोयर,डॉ सुजित जोशी उपस्थित होते.