श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते ‘मोफत बियाने दान’ अभियान संकल्प शुभारंभ

656

पिंपरी, प्रतिनिधी :
मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं.चि शहर यांच्यावतीने दुष्काळग्रस्त परिस्थितीची जाणीव ठेवून दुष्काळी भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीद सैनिकांच्या कुटुंबांना रब्बीच्या पेरणीसाठी ‘जय जवान, जय किसान मोफत बियाणे दान’ अभियानाचा संकल्प आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंग आश्रम, बेंगलोर या ठिकाणी महा. एन.जी.ओ. फेडरेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात श्री श्री रविशंकर यांच्या शुभहस्ते’ जय जवान जय किसान’ मोफत बियान दान अभियान संकल्प शुभारंभ करण्यात आला. मराठवाडा भूमिपुत्रांची सामाजिक जाणिवेची तळमळ पाहून श्री श्री रविशंकर यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी महा एन.जी. ओ.चे संस्थापक शेखर मुंदडा, समन्वयक विजय वरुडकर, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, उद्योजक डी.एस.राठोड, शंकर तांबे, हनुमान जाधव, नितीन चिलवंत, तसेच महाराष्ट्रातील विविध संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ‘जय जवान, जय किसन’ मोफत बियाने दान’ अभियान संकल्प ई-पुस्तिकेेेचे प्रकाशन करण्यात आले.
शेखर मुदडा यांनी सांगितले, की मराठवाडा जनविकास संघाचे बियाने दानाचे कार्य खूप चांगले आहे, तसेच समाजापुढे ई-पुस्तिकेच्या माध्यमातून जात आहात, हे प्रेरणादायी आहे.
नितीन चिलवंत म्हणाले, की मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात दसऱ्याच्या मुहूर्तावर येत्या ८ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर येथून बियाणे दान अभियानाचा शुभारंभ करणार आहोत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त होणारा खर्च टाळून बियाणे दान करण्यात येत आहे.