झोमाटोच्या कमिशनवरून कर्मचाऱ्यांचे आंदोलन

1172

पुणे प्रतिनिधी,

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला सर्व इंस्टंट  हवे असते. नागरिकांची हीच गरज ओळखून झोमाटो  हि कंपनी नावरूपास आली.  या ऑनलाईन  वेबसाईट  वरुन  कधीहि, कुठेही खाद्यपदार्थ मागविणे  सोपे जाऊ लागले. सर्व व्यवहार ऑनलाईन किंवा ऑफलाईन असल्याने या कंपनीला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज  लागली. सुशिक्षित बरोजगार मुले  या कंपनीकडे मोठ्या प्रमाणात वळली. सुरुवातील कंपनीने मोठ-मोठे कमिशन देऊ लागल्याने तरुण वर्गाची आणि सुशिक्षित वर्ग या कंपनीकडे वळू लागला. आता कंपनीने यांच्या कमिशनमध्ये मोठ्या प्रमाणात कपात सुरु केल्याने आणि अतिरिक्त चार्जेस लावल्याने कोंढवा-वानवडी परिसरातील कंपनीतील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी आज काम न करण्याचा निर्णय घेऊन कोंढवा खुर्द मधील कौसरबागेतील मदिना हॉटेल समोर काम बंद करून संप सुरु करून कंपनीच्या विरोधात घोषणा दिल्या.

याबाबत  झोमाटो  कर्मचाऱ्यांनी  सांगितले कि, यापूर्वी कंपनी आम्हाला व्यवस्थित कमिशन देत होती .गेली दीड वर्ष आम्ही कंपनीसोबत काम करत आहोत. कंपनी आम्हास दर आठवड्याला नव नवीन नियम बनवून आर्थिक तसेच मानसिक छळवणूक करत आहे. पूर्वी आम्हाला पाच किमी साठी दहा रुपये कमिशन मिळत असे , पण आता 5.1KM साठी एक रुपया कमिशन मिळत आहे. मल्टीऑर्डर साठी पूर्वी 55 रुपये मिळायचे तेच आता 45 रुपये देत आहे. तर यातील पुन्हा पैसे कमी करून दोन महिन्यांपूर्वी 40रु. द्यायला सुरुवात केली . तर आता 30रु. देत आहे. पुढील आठवड्यापासून म्हणजेच 9 ऑक्टोबर पासून यामध्ये कपात करून 25 रुपये दणार आहेत.. पूर्वी आम्हाला 10KM परिसरात डिलिव्हरी करण्याचे ऑर्डर करण्याचे सांगितली जायची आता तीच 15KM परिसरात करायला सांगत आहेत , आमची ती हिहि तयारी असून कंपनीने त्याचप्रमणे आमचे कमिशन वाढवून देण्याची मागणी झोमाटो  कडे केली आहे. आम्हाला दिवसभरात  12 ऑर्डर करायला सांगितले ज्याचे त्याद्वारे आम्हाला  240 रुपये मिळायचे आता कंपनी आम्हास 14ऑर्डर करायला सांगत असून तेवढेच पैसे देत आहे.

वास्तविक आमची सर्व प्रकारची काम करण्याची तयारी असून कंपनीने कमिशन कमी करू नये तसेच कुठल्याही प्रकारची सक्ती करू नये अशी मागणी हे कर्मचारी करत आहेत.

याप्रकरणी आम्ही झोमाटो कंपनीचे मॅनेजर अजय यांच्याशी सम्पर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही तसेच फिल्ड मॅनेजर प्रशांत यांना फोन केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही, त्यामुळे कंपनीची बाजू समजू शकली नाही. कंपनीने कामगार हिताचा , कंपनीचा नावलौकिकाचा विचार करून कर्मचाऱ्यांची  मागणी मान्य करून मध्यस्थ मार्ग काढण्याची विनंती देखील हे सुशिक्षित युवक करत आहेत.