खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये वाढले गवत; सापांचा नागरीकांच्या जिविताला धोका 

629
छावा मराठा संघटनेचा आंदोलनाचा इशारा
 
ज्ञानेश टकले, पिंपरी, प्रतिनिधी :
पावसाळा सुरु असल्याने खडकी कॅन्टोन्मेंट रेंज हिल सी टाईप येथे मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. मात्र, तक्रार करूनही गवत कापले जात नाही. त्यामुळे येथे सापाचा वावर वाढला आहे. परिणामी नागरीकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वाढलेले गवत कापण्याची मागणी माँ साहेब जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने खडकी कॅन्टोन्मेंटकडे करण्यात आली आहे.
  गेल्या अनेक दिवसापासून परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. याबाबत गणेशोत्सवात प्रतिष्ठानने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे गवत कापण्याची मागणी केली होती. मात्र, कोणताही कर्मचारी गवत कापण्यासाठी आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत: गवत कापले. नवरात्रोत्सवातही अर्ज करून गवत कापण्याची मागणी केली. तीन अर्ज दिल्यानंतर  गवत
कापण्यात आले. पण व्यवस्थित कापले नसल्याने अद्यापही गवत आणि झुडपे  तशीच आहेत. अनेकदा साप पाहायला मिळतात. त्यामुळे सर्पदंश होऊन दगावण्याची भिती व्यक्त होत आहे. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचार्‍यांना याचे कसलेच सोयरसुतक नाही.
         तीन दिवसापूर्वी प्रतिष्ठानच्या निलेश शेवाळे यांना सापाने दंश केला. तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. जर जिवीत हानी झाली असती, तर याला जबाबदार कोण, असा सवालही प्रतिष्ठानने केला आहे.
इथे नेमणूक असलेल्या कामगारांची त्वरित बदली करण्यात यावी आणि दुसरे काम कामगार इथे कामासाठी पाठवावेत. तसेच वाढलेले गवत कापून टाकण्यात यावे व झाडाचे झुडपे कापण्यात यावी  अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.  
                    -रामभाऊ जाधव, छावा मराठा 
                      संघटना पुणे जिल्हाध्यक्ष