कोंढव्यात मनसेचे वंसत मोरे यांना वाढता पाठिंबा

599

कोंढवा प्रतिनिधी:

कोंढवा भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार वंसत मोरे यांनी पदयात्रा काढून घरोघरी भेटी दिल्या. यावेळी नागरिकांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. कोंढवा परिसरात नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी यावेळी सांगितले.
वंसत मोरे यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळातं कात्रज परिसरात मोठ -मोठी विकासकामे केली असून कात्रज परिसाराचा नावलौकिक वाढविला आहे. असेही साईनाथ बाबर यावेळी म्हणाले.


मोरे यांची पदयात्रा कोंढवा परिसरात पोहोताच ठिकठिकाणी नागरिकांनी उत्फुर्तपणे स्वागत केले आणि तुम्ही लढा ,आम्ही सर्वसामान्य मतदार तुमच्या सोबत आहोत असा एकमुखी निर्णय कोंढवा परिसरातील नागरिकांनी बोलून दाखविला आहे.
याप्रसंगी नगरसेवक साईनाथ बाबर, मा.नगरसेविका आरती बाबर, अमोल शिरस, सतीश शिंदे, रुपेश बाबर, हर्षल बाबर तसेच मनसेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.