पिंपरी प्रतिनिधी:
निवडणुकीचे पडघम वाजायल सुरुवात झाली असून, अपेक्षित इच्छुकांच्या भाऊगर्दीत यावेळी बंडखोरी पाहायला मिळाली.बंडखोरी झाल्याने किती उमेदवार रिंगणात राहणार याबाबत उत्सुकता शिगेला पोचली होती सर्वच पक्षातून बंडखोरी झाली होती. पक्षश्रेष्ठींकडून आपापल्या कार्यकर्ते उमेदवारांना शांत करण्याचे आव्हान सर्वच पक्षांसह होते. त्यात शेवटच्या दिवस अखेर बंडखोरांना शांत करण्यात सर्वच पक्षाला यश आले आहे.सध्याची स्थिती पाहता शिवसेना-भाजपा महायुती,राष्ट्रवादी आघाडी, बहुजन वंचित आघाडी, मनसे याबरोबरच भापसे (भारतीय परिवर्तन सेना)अशी चौरंगी लढत होत आहे. भापसे पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दीपक ताटे स्वतः पिंपरी विधानसभा राखीव मतदारसंघातून रोडरोलर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. श्रमिक कष्टकरी वर्ग,व्यापारी उद्योजक, मध्यमवर्गीय,सुशिक्षित बेरोजगार सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्यामागे उभी आहे. एरव्ही तिरंगी होणारी लढत आता चौरंगी पाहायला मिळणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लढतोय- दीपक ताटे
शहरातील कायदा-सुव्यवस्था, मूलभूत गरजा, रस्ते,पाणी,कचरा यामुळे शहराला आलेला बकालपणा प्रदूषित नद्या वाहतूक व्यवस्थेत गुदमरलेले जनजीवन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आदी सर्व प्रश्नांवर भापसेच्या वतीने विधानभवनात आवाज उठवून पिंपरी शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम भापसेच्या वतीने करण्याचा निर्धार व मानस आहे.
-दिपक ताटे