कोंढव्यात महायुतीचे उमेदवार टिळेकर यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

1727

कोंढवा प्रतिनिधी

भाजपा शिवसेना रासप आरपीआय महायुतीचे उमेदवार आ.योगेश टिळेकर यांनी कोंढवा खुर्द गावठाण,शिवनेरीनगर,३५४ मध्ये पदयात्रा काढली होती. यावेळी कोंढवा भागातील नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले. तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत केले.

यावेळी योगेश टिळेकर म्हणाले कि, महायुतीच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदार संघाचा मागील पाच वर्षे अतिशय चांगला असा विकास केला आहे. भविष्यात हडपसर विधानसभा मतदार संघात विकास कांमांचा डोंगर उभा करून हडपसर मतदार संघात आपल्याला मोठ्या प्रमाणात विकास झालेला पहायला मिळेल.
याप्रांगी तानाजी लोणकर, भरत चौधरी, मदन शिंदे, जालिंदर कामठे, सतपाल पारगे, दादा लोणकर, नवनाथ लोणकर, प्रवीण जगताप, प्रतीक लोणकर, अमर गव्हाणे, महेंद्र गव्हाणे,कल्याण गव्हाणे, दिनेश गव्हाणे,अनंता लोणकर, प्रशांत लोणकर, सागर लोणकर, अतुल चौधरी,सोमनाथ हारपुडे,दर्शन किराड,सचिन ननावरे, बापू बाबर, विनोद गव्हाणे, अंबादास शिंगे तसेच शिवसेना-भाजपा महायुतीचे कार्यकर्ते आणि कोंढवा खुर्द ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.