इश्कियाना’ मध्ये विविध कलाविष्कारातून उलगडणार प्रेमाचे रंग

386

पुणे प्रतिनिधी

एम. जी. एम. च्या वतीने ‘इश्कियाना’ या अनोख्या कला आविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘इश्कियाना’ खास कार्यक्रमात प्रेमाचे विविध रंग वैविध्यपूर्ण कलाप्रकारातून उलगडण्यात येणार असून यामध्ये संगीत, गायन, शायरी आणि चित्रकलेचा एकत्रित आस्वाद रसिकांना अनुभवता येईल. मोनिका सिंग, गायत्री सप्रे ढवळे आणि मृणाल भोंगले या अनुक्रमे शायरी, गायन आणि चित्रकला सादर करणार आहेत. या कलाकारांना अनय गाडगीळ, निनाद सोलापूरकर, आमोद कुलकर्णी आणि रोहन वनगे हे साथसंगत करणार आहेत. ‘इश्कियाना’ हा कार्यक्रम शनिवार, दि. १२ ऑक्टोबर २०१९ रोजी सायंकाळी ६ ते ८ वा. पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे. “इश्कियाना” चे प्रवेश मुल्य ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.