औंढे गावामध्ये राज्यमंत्री भेगडे यांचे जोरदार स्वागत

589

मावळ ,प्रतिनिधी :-

मावळ तालुक्यातील औंढे खुर्द व औंढोली गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सोमवारी सकाळी आशीर्वाद घेत प्रचार दौऱ्यास सुरवात केली. यावेळी गावकऱ्यांनी एकच जल्लोषात भेगडे यांचे स्वागत करत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

औंढे खुर्द गावात राज्यमंत्री यांचे महिलांनी औक्षण करत पारंपरिक पद्धतीने फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. याप्रसंगी नागरिकांनी भावना व्यक्त केली की, भेगडे यांनी गावातील तळ्याच्या पुनर्निर्माणचा गंभीर प्रश्न सोडवून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविला, साकव पूल, मुलांना व्यायामशाळा, दलित समाजासाठी मंदिराचे काम, गावाला काँक्रीट रस्ता त्यांचा आमदार निधीतून उपलब्ध करून दिला आहे. लोणावळा- पवनानागर रस्त्याचे काम चालू केले, गावातील 180 महिलांचे विमा फॉर्म भरले आहेत. घरकुल योजनेचा 10 लोकांना लाभ झाला आहे. त्यामुळे आमच्या गावातून राज्यमंत्र्यांनी प्रचंड मतांचा बहुमान नक्कीच मिळेल असे मत औंढे खुर्द गावचे सरपंच अरुण चव्हाण यांनी व्यक्त केले.

आमच्या गावासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी निधी देऊन गावचा सर्वांगीण विकास केला आहे. यामुळे तालुक्याला पुन्हा मंत्रिपदाचा बहुमान नक्कीच मिळणार असा विश्वास आहे.
रोशना नवनाथ पाठारे औंढे खुर्द ग्रामपंचायत सदस्य