राज्यात भाजपची सत्ता आणि मावळात ही भाजपचं येणार -बाळा भेगडे

654

मावळ , प्रतिनिधी:-
कामशेत शहराच्या पुलाच्या मुद्द्याचे राजकारण करून जरी विरोधी पक्ष नागरिकांचे मन वळवू पाहत असला तरी सोमवारी कामशेत येथे झालेल्या प्रचारात येथील नागरिकांनी ही प्रचारफेरी नाही तर आमच्या बाळाभाऊ भेगडे यांच्या विजयाची मिरवणूक असल्याचे दाखवून दिले. सोमवारी कामशेत शहरामध्ये सर्वात मोठी मिरवणूक काढून नागरिकांनी मोठ्या जल्लोषात राज्यमंत्री यांचे स्वागत केले.राज्यात भाजपची सत्ता येणार असून मावळात ही भाजपचं येणार असल्याचा विश्वास बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

आज कामशेत शहरामध्ये मिळालेला प्रतिसाद म्हणजे मी आज या गावातून विजयाचा नारळच घेऊन जात असल्यासारखे वाटत आहे असे मत राज्यमंत्री भेगडे यांनी व्यक्त केले.

विजय शिंदे माजी सरपंच:-
पुलाच्या कामामध्ये इतरही काही समस्या आहेत त्याचे सर्व दोष आमदारांना देऊन चालणार नाही. यामध्ये विरोध पक्ष उगाच राजकारण करू पाहत आहे, आमदार साहेबांनी आत्तापर्यंत जे काही केले आहे ते आमच्या गावच्या भल्यासाठीच केले आहे. कामशेत शहराच्या विकासासाठी 74 कोटी निधी दिला आहे त्यातील 80% काम झालेले आहे.

कामशेत शहर भाजपा अध्यक्ष मोहन वाघमारे –

आमदारांनी आत्तापर्यंत कामशेतसाठी खूप सारा निधी उपलब्ध करून दिला आहे. भूमिगत गटाराचे विषय मार्गी लागलेले आहे. बेरोजगार, घरकुल, विमा योजना यांसारख्या अनेक योजनांचा गावकऱ्यांचा फायदाच झालेला आहे.