तिसऱ्या आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे नेदरलँड येथे २५, २६ रोजी आयोजन

555
पुणे प्रतिनिधी,
जागतिक पातळीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठ आणि नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या आंतराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ ला ही परिषद गांधी सेंटर, (इंडियन नेदरलँड्सच्या एम्बेसीची सांस्कृतिक शाखा), डेनहॅग नेदरलँड येथे होणार आहे. या परिषदेत आयुर्वेदाच्या जागतिक प्रसार वाढविण्यासाठी कार्यपद्धती, आयुर्वेद उपचार पद्धतीची व्याप्ती, आयुर्वेदासमोरील जागतिक आव्हाने, या क्षेत्रातील सर्वात अलीकडील शोध, आयुर्वेदिक शिक्षण आणि संशोधनाचे आदी विषयांवर चर्चा होणार आहेत.
 
विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. मोहन खामगावकर, पुणे येथील वैद्य हरीश पाटणकर यांच्या पुढाकारातून ही परिषद होत आहे. ‘केशायुर्वेद’च्या सदस्या डॉ. गायत्री पांडव, किशोर पांडव यांच्यासह वैद्य वैभव मेहता, वैद्य कुणाल कामठे, वैद्य स्नेहल पाटणकर त्यांचे संशोधनात्मक कार्य या परिषदेत मांडणार आहेत. वैद्य रश्मी वेद आयुर्वेदीय सौंदर्य प्रसादन निर्मिती व महत्व छोट्या कार्यशाळेच्या रुपात सादर करतील, तर नागपूरचे डॉ. तपस निखारे, जयपूरचे डॉ शरद पोर्टे, रायपूरचे डॉ. के. बी. श्रीनिवास राव, मुंबईचे डॉ. प्रियांका ठिगळे-रिसबुड शोधनिबंध सादर करणार आहेत. शिक्षण मंत्रालय व दूतावासातील पदाधिकारी विचार मांडणार आहेत. येथे धन्वंतरी पूजनही करण्यात येणार आहे, असे संयोजन समितीचे सदस्य डॉ. हरीश पाटणकर यांनी सांगितले