‘राजेशाही’चा अनुभव देणारा ‘राजवाडा’ ग्राहकांच्या भेटीला

1577

पुण्यात प्रथमच डिझाईनर, कस्टमाइज ज्वेलरी-कपड्यांसाठी स्वतंत्र भव्य दालन

पुणे : लग्नसराईत, दिवाळी-दसऱ्यासारख्या सण-उत्सवात दागिने आणि कपडे खरेदी हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. खास कलाकुसर केलेले कपडे, त्यावर शोभून दिसण्यासाठी त्याला अनुसरून बनवलेले दागिने या दोन्ही गोष्टी एकाच छताखाली पुणेकरांच्या भेटीला येत आहे. वैशिष्ट्यपूर्ण आणि डिझाईनरदागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सने सेलेब्रिटी डिझाईनर अर्चना कोचर यांच्या सहकार्यातून राजेशाहीचा थाट अनुभवायला देणाऱ्या ‘राजवाडा’ हे विशेष दालन सुरु केले आहे. ‘राजवाडा’ या हटके दालनाचे उद्घाटन मंगळवारी अर्चना कोचर, अभिनेत्री क्लॉडिया सेसला यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी नगरकर ज्वेलर्सचे संचालक वसंत नगरकर, प्रसाद नगरकर, पुष्कर नगरकर आदी उपस्थित होते. 

या दालनाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे डिझायनर कपडे आणि दागिने कस्टमाइज करून मिळणार आहेत. हे कपडे अर्चना कोचर यांनी तयार केलेले असून,  राजवाडा लाउंजच्या माध्यमातून त्या प्रथमच पुण्यात त्यांच्या डिझाईन्स सादर करत आहेत. या दालनात दागिने आणि कपडे एकाच ठिकाणी मिळणार असल्याने ग्राहकांची गैरसोय टळणार आहे. नावाप्रमाणेच हा ‘राजवाडा’ ग्राहकांना राजेशाहीचा अनुभव देणार आहे. येथे येणाऱ्या ग्राहकांना बसण्यासाठी असलेला सोफा, खुर्च्या, पाण्याचे ग्लास, तसेच येथील सर्वच वस्तू शुद्ध चांदीच्या असणार आहेत. अर्चना कोचर यांनी डिझाईन केलेले खास डिझाइनर क्लोथ्स आणि त्याला अनुसरून तयार केलेली डिझाइनर ज्वेलरी येथे असणार आहे.

वसंत नगरकर म्हणाले, “श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्सची ‘सिंगल पीस’ आणि ‘डिझाईन’ ज्वेलरी ही खासियत आहे. जयपूर, हैद्राबाद, चेन्नई आदी भागातील ज्वेलरी आमच्याकडे येते. नगरकर ज्वेलर्स यांचे १०० पेक्षा अधिक कारागीर ही कलाकुसरीची ज्वेलरी तयार करतात. विविध सेलीब्रिटीसोबत काम केलेल्या अर्चना कोचर यांच्यांशी आम्ही जोडले जात असून, कलाकुसरीचे कपडे आणि दागिने यांचे नाविन्यपूर्ण आणि कल्पक मिश्रण येथे उपलब्ध होणार आहे. नगरकर आणि कोचर यांच्या कारागिरीचा मिलाप म्हणजे ग्राहकांसाठी दुग्धशर्करा ठरेल. वेगवेगळ्या सण समारंभातील कपड्यांसोबत नियमित वापरण्यासाठी लागणारे कपडे आणि दागिनेही इथे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सामान्य कुटुंबापासून ते श्रीमंतापर्यंत सगळ्यांसाठीच येथे सुविधा असणार आहे. सर्व वयोगटातील महिला आणि पुरुष यांच्या नानाविविध प्रकातील दागिने आणि कपडे यांची वैविध्यता पहायला मिळेल.”

अर्चना कोचर म्हणाल्या, “बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसाठी डिझाईनर म्हणून काम केले आहे. सामान्य नागरिकांनाही आपल्या कलाकुसरीचा लाभ घेता यावा, या दृष्टीने पुण्यात हे दालन सुरु केले आहे. नगरकर ज्वेलर्स कलाकुसरीच्या दागिन्यांसाठी ओळखले जाते. कपडे आणि दागिने यांची सांगड भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या दालनामुळे पुणे आणि परिसरातील नवरा-नवरीच्या कपडे व दागिन्यांसाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार कस्टमाइज कपडे आणि दागिने देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”