कोंढव्यातील युवकावर खुनी हल्ला

2125

कोंढवा प्रतिनिधी,

विधानसभा निवडणूकीमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघात एका राजकीय पक्षाचा प्रचार केल्याने कोंढव्यातील युवक तसेच शिवप्रेमी सुमित बाबर (वय37 रा. कोंढवा खुर्द,पुणे ) यांच्यावर 20 ते 25 अज्ञात हल्लेखोरांनी खुनी हल्ला करण्यात आला.यामध्ये ते गंबीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवप्रेमी सुमित बाबर यांच्यावर 20 ते 25 जणांनी खुनी हल्ला करून त्यांचा हाताला दुखापत केली आहे, अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असून पुढील तपास सुरू असून हल्लेखोरांना त्वरित अटक केली जाईल तसेच यामधील हल्लेखोरांची गय केली जाणार नाही असेही कोंढवा पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या उद्या सुमित बाबर यांची भेट घेणार असल्याची प्राथमिक माहिती येत आहे.