ह्दयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

742

पिंपरी : भोसरी येथील ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळबडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्दयरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार पासून सुरु झाले असून 10 डिसेंबर 2019 दरम्यान रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा चौक, आळंदी रोड भोसरी येथे आोजित केले आहे,अशी माहिती ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ. सुनिल अगरवाल यांनी दिली.  या शिबिरात पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना ह्दयरोग तपासणी अंर्तगत इ.सी.जी., स्ट्रेस टेस्ट, अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे.  त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा असेही आवाहन डॉ. सुनिल अगरवाल यांनी केले आहे. अधिक माहिती साठी किंवा रजिस्ट्रेशन साठी 91303219766/ 8888825603/7774049691 वर संपर्क करु शकता.
जर पिवळे व केशरी रेशनकार्ड नसेल तर  अ‍ॅन्जिओग्राफी 5000 रुपये, अ‍ॅन्जिओप्लास्टी 60000 रुपये आणि बायपास शस्त्रक्रिया 150000 रुपये या माफक दरात करण्यात येणार आहे.डॉ. सुनिल अगरवाल  एमबीबीएस, एमडी, डीएनबी इंटरनॅशनल कारडीयालॉजिस्ट आहेत. त्यांना अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डीयोलॉजि कडून फेलोशिप देण्यात आले आहे.  भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरा सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील  गरजूनीं या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन  ओम हॉस्पिटल चे संचालक डॉ.अशोक अग्रवाल यांनी केले