गुड ड्रॉप वाईन प्रा. लि.तर्फे  रिओ स्ट्रॉंग एक्स्ट्रा ड्राय वाईन लॉंच

936

गुड ड्रॉप वाईन प्रा. लि.ने नुकतीच आपली रिओ स्ट्रॉंग एक्स्ट्रा ड्राय वाईन हॉटेल ताज, ब्लू डायमंड येथे लॉंच केली. या निमित्ताने रिओ स्ट्रॉंग बुलेट लकी ड्रॉ पार्टीचे आयोजन देखील करण्यात आले होते. रिओ स्ट्रॉन्ग एक्स्ट्रा ड्राय मध्ये फक्त १५.५% अल्कोहोल आहे. या वाईनचा उपयोग फक्त पेय म्हणून नाही तर तर रीफ्रेश करणारा पार्टी स्टार्टर म्हणून देखील करता येऊ शकतो. गुड ड्रॉप वाइनवाईन कूलर उत्पादक क्षेत्रात अग्रगण्य उत्पादक म्हणून उदयास आलेले आहे. गुड ड्रॉप वाईनरीमधून येणारा वाइनचा प्रत्येक थेंब या क्षेत्रात होणाऱ्या  प्रगती आणि वाढीमागील आवड आणि वचनबद्धतेची साक्ष देतो.

 यावेळी बोलताना गुड ड्रॉप वाईन प्रा. लि चे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन रॉड्रिग्ज म्हणाले, “२०१३ मध्ये गुड ड्रॉप वाईनची सुरुवात झाल्यापासून आम्ही वाईन या क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच भारतातील काही वाईन कंपन्यांपैकी एक अग्रगण्य वाईनरी म्हणून पुढे आलेलो आहोत. भारतामध्ये आमचे ९ राज्यांमध्ये वाईनचे वेगेवेगळे १९ फ्लेवर उपलब्ध आहेत.

 ते पुढे म्हणाले की, भारतातील अन्य बाजारपेठेत वेगाने विस्तार करण्याचा आमचा मानस असून, आम्ही राष्ट्रीय पातळीवर मजबूत कंपनी बनण्याचा निर्धार केला आहे.

 ऑस्ट्रेलियाच्या नामांकित बरोसा व्हॅलीमध्ये आपल्या वाइनमेकिंग क्राफ्टची सुरुवात केल्यावर, अश्विन यांनी गुणवत्तापूर्ण वाईन बनविण्यास सुरवात केली. ही अत्याधुनिक वाइनरी नाशिकमधील विंचूर पार्क येथे असून इटलीमधून आयात केलेल्या उपकरणांनी ती चालविली जाते तसेच या वाईनरीची क्षमता ९ लाख लिटर आहे.

रिओ फिझी वाईन रेंजमध्ये तीन स्प्रीटझर्स (रिओ क्रॅनबेरी, रिओ लिंबू आणि पॅशन आणि रिओ ऑरेंज आणि पाइनॅपल) आणि इटालियन रेंजमध्ये (रिओ रोसो, रिओ रोझा टू आणि रिओ बियानको) देखील समाविष्ट आहे. रिओ फिझी वाईन ही भारतातील अव्वल क्रमांकाची मजेदार वाईन आहे. या वाईनने उन्हाळ्याच्या दुपारी देखील थंडीचा अनुभव घेता येतो. रिओ फिझी वाईन मित्रांसोबत, कुटुंबासोबत तसेच विविध कार्यक्रमासाठी उत्साहवर्धक पेय म्हणून अतिशय उपयुक्त आहेत.

 कॅसाब्लांका रेंजमध्ये कॅसाब्लान्का व्हिनो स्पुमेन्टे आणि कॅसाब्लान्का रोझ स्पुमन्टे, सब ब्रँड फ्रिजानो – फ्रिजानो सेमी ड्राय, फ्रिजानो सेमी ड्राय रोझ आणि फ्रीझानो एक्स्ट्रा ड्राय या सर्व वाईन विविध कार्यक्रमासाठी योग्य म्हणून ओळखल्या जातात.

गुड अर्थ रेंज मध्ये प्रीमियम गुणवत्ता रिझर्व्ह वाइन – गुड अर्थ अंतरा (कॅबर्नेट शिराझ), गुड अर्थ बासो (कॅबर्नेट सॉव्हिगनॉन) आणि गुड अर्थ ब्रिओ (शिराझ) गुड अर्थ ब्लैंका (व्हाईट), गुड अर्थ बेला (रोझ) आणि गुड अर्थ ब्ल्यू इ वाईन उपलब्ध आहेत.