महीलेचा खुन करणाऱ्या आरोपींवर ३०२ चे गुन्हे दाखल करून अटकेची मागणी

671

यवतमाळ। १८ नोव्हेंबर
प्रतिनिधी : राष्ट्रीय बंजारा परिषदेचे, राष्ट्रीय अध्यक्ष किशन राठोड यांनी पोलीस स्टे. उपआयुक्त नवी मुंबई, व पो.स्टे. कळंबोली यांना दिलेला निवेदनात, तसेच फीर्यादीने दिलेल्या रिपोर्ट वरुन कलम ३०२ चा गुन्हा नोंदवून तात्काळ अटकेची मागणी केली आहे, पोलीस स्टेशन कळंबोली हद्दीत तीन ईसमांनी दोन महीलेच्या जबर मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एका महीलेचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २०.१०.२०१९ रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कळंबोली येथे घडली.
सौ.कमळाबाई बाळू जाधव असे मारहाणीत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. मृतक सौ.कमळाबाई जाधव व सौ.सुनिता बालाजी राठोड ह्या सकाळी कचरा वेचन्याकरीता स्टील मार्केट कळंबोली येथे गेल्या असतांना त्या गोडावून क्र.३८० व ३८३ येथे पोहचल्या असतांना त्यांना तेथील अनोळखी इसमाने कमळाबाई या महिलेला आमच्याकडे भंगार आहे. असे सांगून बोलावून त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना लोखंडी सळई व लाकडाने दोघींना जबर मारहाण केली. व आरोपीने त्यांच्या अधिक दोन साथीदारांना बोलावीले असता त्यांनीसुध्दा त्यांना जबर मारहाण केली. त्या मारहाणीत सौ.कमळाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पनवेल येथील सरकारी रुग्णालयामध्ये दिनांक २२.१०.२०१९ रोजी दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. मारहाण करणार्यांमध्ये वाचमन व इतर दोन साथीदर असेल्याचे सौ.सुनिता राठोड यांनी सांगीतले. सदर घटनेची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असतांना पोलीसांनी अनोळखी आरोपींविरुध्द भादंवि ३२३, ३२४, ३२६ नुसार गुन्हे दाखल केले आहे. तरीही अद्याप पावेतो खर्या आरोपींवर काही कारवाई करण्यात आली नाही. यामध्ये फिर्यादी सौ.सुनिता राठोड यांना व मृतक सौ.कमळाबाईंना तिघांनी मारहाण केली असल्याचे सांगून जबाब देऊनसुध्दा ती अशिक्षीत असल्याचा फायदा घेत पोलीसांनी जबाबात बदल केला आहे. पोलीसांनी आरोपींना पाठीशी घालून खर्या आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेवून सदर गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम ३०२ दाखल करुन तीनही आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
आरोपींना अटक न झाल्यास जन-आंदोलन करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, सर्व जिल्हाअध्यक्षांनी केले आहे.