दिवे घाटातील अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची जिल्हाधिकारी राम यांनी केली विचारपूस

712

पुणे दि.19.– पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवेघाटात आज नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात 2 जन मृत्यू पावले तर 24 जण जखमी झाले. या सर्वांना हडपसर येथील नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी झालेल्या वारकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासमवेत हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन बारवकर, अतिदक्षता विभागाचे डॉ. मिलिंद माने, आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राम म्हणाले की, प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठी शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात येत असून ही घटना घडायला नको होती. या घटनेचे मलाही दुःख झालेले आहे. हे हॉस्पिटल वैद्यकीय सुविधा सर्वांना चांगली देत आहेत असेही ते म्हणाले.

यावेळी वारकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

००००