दलित पँथर च्या राष्ट्रीय महासचिव पदी स्वनिल (बाबा) कांबळे

553

सागर बोधगिरे, पुणे

पुणे शहरातील युवा कार्यकर्ते स्वप्नील (बाबा) कांबळे यांची नुकतीच दलित पँथर या संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव या पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी मुंबईत केली असून ,चांगली कार्य करून दलित पँथर चे ध्येय लोकांपर्यंत नेऊन लोकांचे प्रश्न सोडवून चळवळ आणखी व्यापक करून चळवळ व संघटना अजून समर्थ कराल.संघटनेची ध्येय धोरणे व भूमिका यांस बाध न आणता संघटनेच्या बांधणीचे अधिकार यावेळी या पत्राद्वारे दिले व त्यांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संघटनेच्या प्रत्येक कार्यात व समाजाच्या कल्याणासाठी वेळोवेळी तत्पर उभा राहील व संघटनेच्या माध्यमातून रोजगार,महिला व बालकांचे प्रश्न , तृतीयपंथी यांना न्याय ,तसेच विविध क्षेत्रातील लोकांना त्यांचा न्याय मिळविण्यासाठी त्यांना मदत करेल व संघटनेची उंची व प्रतिमा नक्कीच योगदान देईल असे यावेळी नवनियुक्त राष्ट्रीय महासचिव स्वप्नील(बाबा) कांबळे यांनी व्यक्त केली.