पल्लवी तावरे यांच्या मेकअप स्टुडिओचे उद्घाटन

636

सागर बोदगिरे,पुणे,

पल्लवी तावरे यांच्या लेव्हल ५ मेकअप स्टुडिओचे उदघाटन सिंहगड रस्त्यावरील तावरे यांच्या लेव्हल ५ युनीसेक्स सलून मेकअप स्टुडिओ येथे पार पडले. हा उद्घाटन सोहळा हडपसर येथील पचपन वर्ल्ड फोरम अक्षय घरटे या अनाथ आश्रमातील मुलींच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर मेकअप आर्टिस्ट पल्लवी तावरे, समन्वयक प्रशांत बोगम, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रा. रश्मी नलावडे आणि अनाथ आश्रमातील मुली उपस्थित होत्या.

उद्घाटनाच्या वेळी आश्रमातील किर्ती गायकवाड म्हणाली, आमच्या अनाथाश्रमात बेघर, अनाथ, लिंबू मिरची विकणाऱ्या, रत्यावर भिक मागणाऱ्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यावर योग्य संस्कार करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याकरिता आश्रमाचे मुख्य कार्यवाहक रतन माळी हे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तेथील ज्ञान मिळावे यासाठी प्रयत्नशील असतात. आजच्या या कार्यक्रमात आम्हाला योग्य तो मान सन्मान देऊन निमंत्रित केले यामुळे आम्ही मुली खुश आहोत. परंतु यापेक्षा जास्त आनंद आम्हाला मेकअपचे प्रशिक्षण मिळणार आहे यामुळे आहे. या प्रशिक्षणातून जास्तीत जास्त ज्ञान संपादन करून शिक्षण पूर्ण करून आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू.

यावेळी बोलताना तावरे म्हणाल्या, या क्षेत्रात मला स्वतःला समृध्द करायचे आहेच पण माझ्यासारख्या मुलींना ज्यांना क्षेत्राची आवड आहे परंतु कुणाचाच पाठिंबा नाही अशा मुलींना या क्षेत्राबद्दल आत्मविश्वास द्यायचा आहे. याकरिता इच्छुक असलेल्या संस्था आणि मुलींनी स्टडिओला भेट द्यावी. वीस वर्षाच्या या क्षेत्रातील अनुभवांती या क्षेत्रात येणाऱ्या नव्या पिढीसाठी एवढेच सांगेल की, मेकअप ही कला शिकल्यानंतर काही काळ वाट पाहून दुसरे क्षेत्र निवडू नका. संयम, छंद आणि जिद्द असेल तर हे क्षेत्र तुम्हाला कामातून आणि आर्थिक पातळीवर सक्षम करते.

इच्छुक संस्था आणि मुलींनी भेट देण्यासाठी संपर्क : ८९७५६८४७८४