SNAP इंटरनॅशनल स्कूल रहाटणीने जिंकली अखिल भारतीय आंतरशालेय बॅंड स्पर्धा.

601

अखिल भारतीय आंतरशालेय बॅंड स्पर्धा SNAPइंटरनॅशनल स्कूल रहाटणीने प्रथम क्रमांक मिळवून जिंकली.बक्षीस रु 50000/-,द्वितीय क्रमांक जि.मायनर- गोपालन इंटरनॅशनल स्कूल-बेंगलोर.बक्षीस रु 35000/-.तृतीय क्रमांक द सोअरींग इगल-सेंट जॉर्जस स्कूल चंदीगड,तसेच बेस्ट गिटारसाठी ऑनस्टेज कंपनी कडून फेंडर गिटार,बेस्ट किबोर्डला यामाहा कंपनीचा किबोर्ड,बेस्ट ड्रमरला ड्रमसेट व बेस्ट बेसिसला बेस गिटार देण्यात आली. ब्लु रिज पब्लिक स्कूल ग्राऊंड येथे पुढील मान्यवरांनी बक्षीस वितरण केले.टोरीसचे ब्रॅंड अॅम्बेसिडर(शंकर एहसान लॉय फेम)एहसान नुराणी,ऑनस्टेजचे प्रमुख श्री जसबीर,टोरीन्सचे सीईओ सुनील सुंदरम,टोरीन्सच्या अरुंधती साठे ब्लु रिजच्या मुख्याध्यापिका स्मिता क्षिरसागर,करण गुप्ता(जयपुरीया स्कूल लखनौ),संयोजक करणविर मेहरा,जज-रवी अय्यर,मेर्लिन डिसोझा,वरुण वेंकट,विजय जोशी आदी मान्यवरांच्या बरोबरच पालक व नागरिक असे सुमारे ७०००जण उपस्थित होते.या स्पर्धेत देशभरातील १४ शाळांच्या बॅंडनी सहभाग घेतला.यावेळी मार्गदर्शन करताना एहसान नुराणी यांनी ५ वी ते १२ वी या वयोगटातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणे व त्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कार्य करणार असल्याचे संगितले.