मामासाहेब मोहळ प्राथमिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

707

पौडरोड, वार्ताहर.

पौडरोड येथील कै. मामासाहेब मोहळ प्राथमिक विद्यालय, मनपा शाळा क्रमांक-९४ मुलांची केळेवाडीतील शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्य गृह येथे सादर केले. या कलाविष्कार-कलागुणांच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन या प्रभागातील माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर या मान्यवरच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने व उत्साहाने जगण्याचा तसेच शेतकर्‍यांच्या व्यथा आपल्या गाण्यातून मांडून समाजामध्ये मोलाचा संदेश लहानग्यांनी दिला. लोप पावत चाललेल्या लोकसंस्कृती व लोकगीतांकडे दृष्टिक्षेप टाकत अस्सल मराठमोळी गीतांचा कार्यक्रम यावेळी सादर झाला. भक्तिगीत, ओवी, वासुदेव गीत, गोंधळ, शेतकरी गीत, आदिवासी नृत्य, धनगरी गीत, कोळी गीत, गवळण, वाघ्या मुरुळी, जोगवा आदी गीतांनी परिसर रंगून गेला. विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली. मराठी संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी यातून घालून दिला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पर्यवेक्षिका प्रतिभा खाडे, दमयंती राऊत यांचेसह आदी शिक्षकांनी नियोजन केले.
याया कार्यक्रमास मुख्याध्यापिका करुणा पाठारे (मंत्री) यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास माजी उपमहापौर नगरसेवक दीपक मानकर, कानडे काका, अनुजा चोपडे. दत्तात्रे पानसे, दिव्या बंदी
यांचेसह पालक व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता मारणे यांनी केले.
.