अजून किती घेणार बळी ?? नागरिक त्रस्त, प्रशासन मस्त….

985

अपघाताने शिवनेरी नगर पुन्हा हादरले!!!

गणेश जाधव, कोंढवा प्रतिनिधीब्र

ब्रह्मा अवेन्यू संकुलाला लागून असलेल्या रहदारीच्या रस्त्यावर आज सकाळी आठच्या सुमारास एका अवजड ट्रक मुळे अपघात  झाला .शिवनेरीकडे जाणारा ब्रम्हा अवेन्यू  रस्त्यावर एका  ट्रकने चढावर पुढे जाताना मागे येऊन रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या (नीता विरकर रा.वानवडी MH12NU3420) यांच्या कारला धडक दिली तसेच ट्रक मागून येणारी महिंद्रा झायलो (MH12 GZ5655)  अपघाती धडक  दिल्याने अपघात झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत चालक  सचिन चव्हाण यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की ट्रक शिवनेरीच्या दिशेने जात असता तीव्र चढ असल्याने ड्रायव्हरचा ट्रकवरील ताबा  सुटल्याने ब्रह्मा अवेन्यू रस्त्यावरील एका कारला तो धडकला व धडकेअंती मागून आलेली माझी झायलो कार देखील धडकली .
सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसून .पुन्हा एकदा लोकांच्या  सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे लक्षात येते. 
अपघात घडल्यानंतर ट्रक चालकाने ट्रक रस्त्यावर सोडून पळ काढला .सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक साईनाथ बाबर यांनी त्वरित  घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता साईनाथ बाबर म्हणाले की,” ब्रम्हा अवेन्यू च्या तीव्र चढ-उतार याबाबत वारंवार महानगरपालिका ,पोलीस प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तीव्र चढाचा आणि उताराचा सर्वे केलेला असून रस्त्याच्या कामासाठी लागणारे बजेट मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 
शिवनेरी नगर ते लुल्लानगर हा प्रस्तावित रस्ता फक्त जागा मालक (पारसी समाज) जाग देत नसल्याने  रस्त्याचे काम रखडले आहे. हा रस्ता झाल्यास कोंढवा गावठाण ते शिवनेरी नगर या रस्त्यावरचा वाहतुकीचा ताण कमी होणार आहे तसेच शिवनेरी नगर ते इस्कॉन मंदिर या रस्त्याचे काम देखील जागा मालक जागा देत नसल्याने रखडले आहे.
सुदैवाने जीवितहानी झाली नाही ,परंतु अजून प्रशासन किती लोकांचे बळी घेणार आहेत ? तीव्र चढ-उतार कमी करावा या संदर्भात प्रशासनाचे अनेक पत्रव्यवहार  केले, परंतु अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे त्यामुळे त्यांना याचे गांभीर्य लक्षात आले नाही . पुढे नगरसेवक साईनाथ बाबर  म्हणाले की यानंतर होणाऱ्या अपघातास प्रशासन जबाबदार राहील.”
यासंदर्भात स्थानिक रहिवाशी अंबादास शिंगे ,सुरेश गायकवाड  यांनी सांगितले की आत्तापर्यंत साधारणता 9 पेक्षा अधिक अपघात या तीव्र उतारामुळे झाले या संदर्भात प्रशासनाला अनेक पत्रव्यवहार केला. महानगरपालिकेची संपर्क साधला परंतु काहीही हाती लागले नाही… ब्रह्मा अवेन्यूची भौगोलिक परिस्थिती तसेच तीव्र चढ-उतार असल्यामुळे महानगरपालिकेने तज्ञ इंजिनीयर द्वारे सदर रस्त्याचे अवलोकन करावे अशी मागणी रहिवाशांनी केली .या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा रहिवाशांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित राहिला आहे .या दुर्घटनेत सुदैवाने रिक्षाचालक थोडक्यात बचावला गेला .रिक्षा चालकाशी संपर्क साधला असता रिक्षाचालक म्हणाला “दैव बलवत्तर होते म्हणून मी वाचलो “.
आज पर्यंत या रस्त्यावर सात जणांचे बळी गेले असून अजुन किती लोकांचे बळी महापालिका प्रशासन घेणार आहे असा उद्दिग्न सवाल सामाजिक कार्यकर्ते अतुल चौधरी यांनी महापालिकेस केला आहे. या रस्त्यावरील तीव्र चढ कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी कोंढवा पोलीस स्टेशनची संपर्क साधला असता पोलीस नाईक बक्कल नंबर २४२५ टपके यांनी घटनास्थळी धाव घेतली व सदर घटनेची नोंद पोलीस दप्तरी घेऊन वाहतूक मोकळी केली.
या रोड वरील तीव्र उतार कमी करण्यासाठी मल्हार न्यूज ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या असून गेंड्याची कातडी असलेल्या महापालिकेनी याची वेळीच दखल घेतली असती तर आजचा अपघात घडला नसता.