खेर्डा येथील महीलेची हत्या करणार् या आरोपीस तात्काळ फाशी द्या

460

एकंबेकर दशरथ,देगलूरः

मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेची हैदराबाद नंतर बुलढाना जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे पुनरावृत्ती झाली. असेच खेर्डा येथील दिव्यांग असलेल्या ललीताबाई खरात या 55 वर्षीय मेंढपाळ महीलेची बलात्कार करून तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली.या घटनेने परीसरात खळबळ ऊडाली आणि राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ तीव्र आक्रोश आणि विरोध करण्यात येत आहे ,याच्या निषेधार्थ देगलूर येथे, उप विभागीय अधिकारी देगलूर व तहसिलदार यांना सकल धनगर समाज देगलूर तालुक्याच्या वतीने निषेध नोंदवत आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे ,अन्यथा सकल धनगर समाज देगलूर तालुका यांच्या वतीने तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी निवेदनावर संदीप राजुरे,ऊत्तम वाडेकर,प्रा.वजीरे सर,भीमराव येलबुगडे,दत्ता कोकने,ज्ञानेश्वर चिंतले,किशन राजूरे,लक्ष्मण शेळके, वसंत आडेकर आदीं कार्यकर्त्यांची
स्वाक्षरी करून निवेदन देण्यात आले आहे.