विद्यार्थ्यांकडून गटारांची साफसफाई

736

अनिलसिंग चव्हाण, बुलढाणा

  1. बुलडाणा खामगाव तालुक्यातील कारेगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून शाळेसमोरील गटार आणि नाल्या साफ करवून घेतले जात असल्याचा गंभीर प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चिमुकले नाल्यातील घाण कचरा साफ करीत असतांना येथील शिक्षक मात्र उघड्या डोळ्यांनी बघ्याच्या भूमिकेत दिसून आले. यामुळे संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांचा गटारे साफ करण्याचा व्हिडीओ दुपार पासून सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. 
  2. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती देण्यात येतात. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या कारेगाव बु. येथील शाळेत शिक्षणाएवजी शिक्षकांकडून इयत्ता १ ते ७ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनच शाळेसमोरील संपूर्ण गावातील घाण कचरा साचलेले गटार साफ करण्यासाठी उपसून साफ करवून घेतल्याचे सकाळी निदर्शनास आले. कारेगाव येथील जिल्हा परिषदेच्या करीत करणाऱ्या सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आज आज सकाळची शाळा होती मात्र शाळेत आज शिक्षण आयॉजी चिमुकल्या हाताने कडून गटारे साफ करून घेतले गेले हा प्रकार येथील काही नागरिकांनी कॅमेरात कैद करून गावातीलच व्हाट्सअप च्या माध्यमाने प्रसारित केले यामुळे बघ्यांची भूमिका घेणाऱ्या शिक्षकां प्रति गावातून संतापाची लाट उसळली आहे याबाबत मुख्याध्यापक चांदणे यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकार हा गंभीर असून याबाबत चौकशी करून कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले त्या नंतर प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड यांच्या सोबत प्रतिक्रिया देण्या बाबत विचारले असतात त्यांनी बाहेर असुन प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर योग्य कारवाही करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल जाधव यांनी दिला आहे