लघुचित्रपट महोत्सवात ‘महाअवयवदान’ आभियान

524

पुणे 

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ‘चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट ‘महोत्सवाचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले.या महोत्सवात प्रामुख्याने सामाजिक उपक्रम म्हणून ‘महाअवयवदान ‘आभियान राबविण्यात येत आहे.व त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे .
हा महोत्सव नांदेड सिटी डिस्टीनेशन माल(Mall)येथील राजे राजवाडी हाटेल Hotel येथे आयोजित करण्यात आला आहे .दि.३०डिसेंबर २०१९ पर्यंत १३२देशातील विविध भाषेतील लघुचित्रपट येथे पाहण्यास मिळणार आहेत.महोत्सवात यावर्षी प्रामुख्याने सामाजिक कार्यात सहभाग म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘महा अवयवदान अभियान अंतर्गत नागरिकांकडुन अवयवदान संमतीपत्र इच्छेनुसार भरुन घेण्यात येत आहे .मृत्यूनंतर गरजु रुग्णांच्या उपचारासाठी अवयव देण्याचा उल्लेख या संमतीपत्रात आहे .हे संमतीपत्र विहित नमुन्यात असुन
इच्छुकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन नोंदणी करावी.असे या महोत्सवाचे आयोजक अमोल भगत मिडियाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .आधिक माहितीसाठी ९६५८४३५५५५ या भ्रमणध्वणीवर संपर्क साधावा.