नागरिकता संशोधन विधेयका विरोधात चिखलीमधे बसपाचा मुक मोर्चा  

858

अनिलसिंग चव्हाण, बुलढाणा

चिखली : भारतीय राज्य घटना हि न्याय, समता आणी बंधुता या मुलभुत तत्वांवर आधारीत असुन यातील महत्वाचे कलम १५ अन्वये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे की, धर्म, वंश,जात, लिंग, जन्मस्थान इत्यादीचे आधारावर भारतीय समाजात भेदभाव करता येणार नाही. मात्र मुलतत्ववादी भाजपा सरकारच्या कार्यकाळात संविधानातील वैधानीक तत्वांना छेद दिला जात असुन भारतात जन्मलेल्या व पुर्वापात रहिवासी असलेल्या मुस्लीम समाज बांधवांना दुय्यम दर्जाची वागणुक दिली जात आहे हे नागरीकता सशोधन विधेयक पारीत करुन विद्‌मान सरकारने सर्व मुस्लीम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत.
      नागरिकता संशोधन विधेयाच्या विरोधात भारतभर ठिकठिकाणी निदर्शने होत आहे या पार्श्र्वभुमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज दि.२० डिसेंबर २०१९ रोजी स्थानीक जयस्तंभ चौक फुले आंबेडकर वाटीके पासुन शेकडो मुस्लीम बांधव व बसपा कार्यकर्ते इतर बहुजन बांधव मुक मोर्चाव्दारे चिखली तहसिलचे तहसिलदार अजित येळे यांच्या मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन देण्यात आले.
      सदर निवेदनाव्दारे असे सुचीत करण्यात आले आहे की, दि.९ डिसेंबर २०१९ रोजी लोकसभेत आणी ११ डिसेंबर २०१९ रोजी राज्य सभेत सिटीजन अमेंडमेंट बिल २०१९ (नागरिकता संशोधन बिल) बहुमताने मंजुर करुन इंडियन सिटीझन अ‍ॅक्ट १९५५ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असुन त्यामध्ये मुस्लीम धर्मीयांना जाणीव पुर्वक वगळुन इतर धर्मीयांना नागरिकत्व देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे. भारतीय संविधानाचे उल्लंघन करुन सदर विधेयक मंजुर करण्यात आले आहे. सदर विधेयक हे असंवेधानीक असुन मुस्लीम धर्मीयांच्या नागरीकांवर अन्याय करणारे हे विधेयक आहे. त्यामुळे सदर विधेयकावर पुनर्विलोकन व संशोधन होणे नितांत गरजेचे आहे.
या संदर्भात बहुजन समाज पार्टी च्या राष्टीय अध्यक्षा मा. बहेन मायावतीजी यांनी मा. महामहीम राष्टपती यांची भेट घेऊन सदर विधेयकाविरोधात मतदान करुन विरोध केलेला आहे तसेच निवेदन सुध्दा दिलेले आहे. त्याच धरतीवर बहुजन समाज पार्टी चिखली विधानसभेच्या वतीने प्रशांतभैया डोंगरदिवे जिल्हा प्रभारी यांनी मुक मोर्चाचे आयोजन केले होते .
      सदरचे नागरिकता संशोधन विधेयक हे नागरिकांच्या सार्वभौम अधिकार कर्तव्यांची पायमल्ली करणारी बाब असुन या बाबत महामहिम राष्ट्रपतींनी पुनर्विचार करुन भारतीयत्व आणी भारतीय राज्य घटनेत अंतर्भुत करण्यात आलेल्या तत्वांनुसार योग्य ते बदल करुन बहुसंख्य मुस्लीम समाज बांधवांना आपण भारतीय असलेला सार्थ अभिमान हा भविष्य काळातही निर्वीवाद राहावा या दृष्टीने पावले उचलावीत असे सदर निवेदनात नमुद केले आहे.तसेच या मुक मोर्चाला समाजवादी पार्टी चे अब्दुल रौफ खान अ.मजिद खान यांनी जाहीर पाठींबा दर्शविला या मुक मोर्चासाठी चिखली शहरातील व परिसरातील तसैच बसपाचे प्रदेश सचिव प्रभातजी खिल्लारे, प्रदेश सदस्य मनोजराव इंगळे, जिल्हा प्रभारी प्रशांतभैया डोंगरदिवे, जिल्हा सचिव धम्मपाल तायडे, पत्रकार ईफ्तेखार खान, सामाजिक कार्यकर्तै शेख ईम्राणभाई, अॅड. शेख ताज महोम्मद, अॅड. सलीम शेख, सिद्दीक अली खान, शेख हैदर, शौकत शेख, अलीबाबा खान, आसीफ भाई, म.आरीफ, नफीस अहमद, सुरज अवसरमोल, सुजीत बोरकर, गंगाराम गवई, संजय गवई, रोषण बोरकर, रफीक सेठ कुरेशी, पाशुसेठ हाजी साहब, रौफ बाबुजी, आसिफ अली शाह,राजु रज्जाक, खलील बागवान, सलीम मन्यार, शेख रईस, शेख शहेजाद, अफरोज बागवान,वसिम शहा, यांच्या बहुसंख्य बसपा कार्यकर्ते व मुस्लीम समजाबांधव उपस्थित होते.