“मनस ३”चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न.

700

क्रिएटीव्ह मास हाऊसच्यावतीने “मनस ३” या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन चंदन शहा,जे डी पवार,रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजक वत्सला पांडे यांच्यासह देशभरातील ५० चित्रकार उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना चंदन शहा यांनी चित्रकार हा चित्र काढण्यासाठी चित्र काढत नाही तर अभिव्यक्तीसाठी चित्र काढतो असे प्रतिपादन केले.जे डी पवार यांनी चित्र कलेच्या माध्यमांत विविधता येत आहे असे संगितले.आयोजक वत्सला पांडे यांनी देशभरातील कलाकृती एकाच छताखाली पाहावयास मिळाव्या या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे संगितले मंगळवार दिनांक २४ डिसेंबर ते गुरुवार दिनांक २६ डिसेंबर २०१९ या कालावधीत मोनालिसा कलाग्राम,कोरेगाव पार्क येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ७.३०.या वेळात सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.