पुणे प्रतिनिधि,
महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनेलचे संपादक अमित कुचेकरयांची राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या चित्रपट,कला व सांस्कृतिक विभागाच्या प्रसिद्धी प्रमूख(महाराष्ट्र राज्य)पदी निवड करण्यात आली. त्यांना याबाबतचे निवडीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी आमदार चेतन तुपे पाटील,बाबा पाटील कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य,मा.आमदार अंकुश काकडे,नगरसेवक विशाल तांबे इ.मान्यवर उपस्थित होते।
दरम्यान सांस्कृतिक विभागाच्या पदी आपली निवड झाल्याने आपण कला क्षेत्रातील मान्यवरांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देऊ असे अमित कुचेकर यावेळी म्हणालेत्यांना चित्रपट, नाट्यक्षेत्र, पत्रकार, तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Home
पश्चिम-महाराष्ट्र
पुणे अमित कुचेकर यांची राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रसिद्धी प्रमूखपदी निवड