राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आदर्श माता पुरस्कारांचे वितरण

735

पुणे प्रतिनिधि,

राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा समितीतर्फे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ गौरव आदर्श माता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . कसबा पेठमधील लाल महाल येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार सोहळा समितीचे अध्यक्ष मुकेश यादव , महिला अध्यक्षा संगीता भालेराव , मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे , आमदार सुनील कांबळे यांच्या पत्नी प्रिती सुनिल कांबळे , श्री रोकडोबा मंदिर देवस्थान समितीचे सदस्य तानाजी शिरोळे , माधवराव बारणे , विजयसिंह तौर , चेतन मोरे , नगरसेवक योगेश समेळ , विशाल कोंडे , राजू लांडगे , राजू थोरात , वसंत खुटवड , आकाश भालेराव , छाया खैरनार , ज्योती खुटवड , विशाखा भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमात मावळा संघटनेच्या अध्यक्षा रुपाली पाटील , सामाजिक कार्यकर्त्या छाया भगत , रणरागिणी ग्रुपच्या अध्यक्षा उज्वला गौड , रणरागिणी महिला बाउन्सर ग्रुपच्या अध्यक्षा दीपा दीपक परब , प्रियांका धुमाळ , सामाजिक कार्यकर्त्या विद्या पाटील , डॉ मानसी पाटील आदींचा राजमाता जिजाऊ गौरव आदर्श माता पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे संयोजन राकेश सुतार , दत्तात्रय मुंढे , ओंकार देशमुख , राजू थोरात , दिनेश यादव यांनी केले होते