कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले अमृततुल्य

1021

पुणे प्रतिनिधी,

सुरुवातीला मेलामाईन.. आता कलर… पुन्हा काहितरी… अशा स्वरूपाच्या अफवा उठवून नावारुपाला आलेल्या मराठी उद्योकजकाला जाणूनबुजून मागे खेचण्याचा प्रयत्न – येवले

: ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमावण्यापेक्षा आम्ही उपाशी राहू. मात्र कोणाच्याही अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत. मेलामाईन व कलर हे घातक पदार्थ चहात टाकून विकण्याची गरज नाही. आमच्या येवले अमृततुल्य या ब्रँड ला तब्बल चाळीस हजार हून अधिक लोकांची फ्रँचाइसीची मागणी आहे, परंतु केवळ गुणवत्ता टिकवण्यासाठी आम्ही आतापर्यंत फक्त २२० फ्रँचाइसी दिल्या आहेत. यावरूनही आमचा केवळ पैसे कमावणे हा उद्देश दिसून येत नाही.. केवळ फ्रॅंचायज़ी वितरित करणे हे आमचे उद्दिष्ठ नसून जास्तीत जास्त उद्योजक घडवणे व रोजगार निर्मिती करणे हे ध्येय असल्याचे येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले म्हणाले. ‘येवले अमृततुल्य’ हा ब्रॅंड मोठा करण्यामागे खुप मोठं उद्दिष्ठ आहे.

आम्ही आमच्या कोणत्याही पदार्थात मेलामाईन, कलर किंवा इतर काही भेसळीचे घटक वापरले नाहीत, वापरत नाही आणि वापरणार सुद्धा नाही.

एफडीएने सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची न्यायालयीन कारवाई अजूनपर्यंत आमच्यावर झालेली नाही किंवा त्याप्रकारचे कोणतेही कारवाईचे पत्र आम्हाला मिळालेले नाही.लोकांना चांगल्या दर्जाची सेवा, गुणवत्तापुर्व पदार्थ योग्य दरात विकण्याबरोबरच त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. मात्र सोशल मिडीया आणि इतर ठिकाणी पसरवल्या जाणा-या चुकीच्या बातम्यांमुळे त्याचा परिणाम व्यवसायावरती तर होतोच त्याबरोबर कामगार वर्गांवर व त्यांचा कुटुंबावर सुद्धा होतो.

पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील चहाप्रेमींचे हक्काचे ठिकाण म्हणजे ‘येवले अमृततुल्य’. मराठी व्यावसायिकाकडून ‘चहा’चा ब्रॅंड करुन राज्यात अनेक ठिकाणी तरुणांना रोजगाराच्या

संधी उपलब्ध झाल्या आहेत. ज्याप्रकारे आम्ही चहाची गुणवत्त्ता वाढविली त्याचे सातत्य ठेवले त्यामुळेच ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस ‘येवले अमृततुल्य’ मध्ये वाढत राहिली.

तरी आमचे जनतेला आवाहन कि कोणत्याही अफवांवर अगर चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेऊ नये. अफवांप्रमाणे आम्ही कोणतेही कृत्य केलेले नाही व आम्ही आमच्या ब्रँड नावाप्रमाणेच ” येवले अमृततुल्य” अश्या अमृताची ग्राहकांना सेवा देतो.

या पत्रकार परिषदेस येवले अमृततुल्य चे संस्थापक तेजस येवले व नवनाथ येवले यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी येवले अमृततुल्यचे कायदेशीर सल्लागार सुधीर रेड्डी,सोनाली परब व कंपनीचे प्रतिनिधी आम्रपाली मोरे व अल्पा कंदगुळे आणि टीम उपस्थित होती.
अशाप्रकारे जर मराठी व्यावसायिक स्वत:च्या कष्ठाने नावारुपाला येत असेल आणि त्याला खाली खेचण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. यातच असे दिसून येते कि येवले अमृततुल्य चे यश सामावले आहे.