“कोंढवा पोलिसांची यशस्वी कामगीरी… खुनाच्या आरोपीचा २४ तासात घेतला वेध

619

गणेश जाधव,

पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे याचाच काय तो प्रत्यय कोंढव्यात आला .कोंढवा लेप्रोसी हॉस्पिटल, येवलेवाडी येथे खुनाचा प्रकार घडला .याठिकाणी एक अज्ञात इसमाचे शव रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे स्थानिक रहिवाशी श्री. सुहास धांडेकर रा. येवलेवाडी यांनी याबाबतची माहिती दूरध्वनीद्वारे कोंढवा पोलिसांना दिली.

सदरची माहिती मिळताच कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड , पोलीस आयुक्त परिमंडळ 5 श्री.सुहास बावचे व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी ,(पुणे शहर )श्री. सुनील कलगुटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एका इसमाचे शव रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे तसेच त्याच्या बाजूला लाकडी दांडके व रक्ताने माखलेला मोठा दगड दिसला .

सदर मयत इसमाची स्थानिकांकडून शहानिशा केली असता अक्षय सुरेश गायकवाड उर्फ बंटी, वय २७ वर्षे रा.येवलेवाडी येथील असल्याचे कळले .याबाबतची सखोल चौकशी केली असता मयत इसम अक्षय गायकवाड ऊर्फ बंटी हा काही कामानिमित्त घरातून बाहेर गेल्याचे कळले परंतु तो घरी न आल्याने त्याचदिवशी रात्री दोनच्या सुमारास त्याच्या वडिलांनी संपर्क साधला असता “मी घरी येतो मग बोलू असे असे एवढेच बोलणे झाले परंतु त्यानंतर अक्षय उर्फ बंटी घरी न आल्याचे तसेच सकाळी त्याचा मृतदेह कोंढवा लेप्रोसी हॉस्पिटल ,येवलेवाडी कमानीजवळ पडला असल्याचे कळले असे त्याच्या वडिलांकडून समजले .
त्या अनुषंगाने अज्ञात इसमा विरुद्ध भादवि कलम ३०२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला ,दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आरोपींचा कोणताही पुरावा तसेच गुन्ह्याचा मागमूस नसताना आरोपींना अटक करणे जिकरीचे होते अशा वेळेस कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनायक गायकवाड यांनी मृत अक्षय सुरेश गायकवाड उर्फ बंटी यांच्या वडिलांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून काही जुजबी माहितीच्या आधारे संशयित आरोपी श्री.योगेश कांबळे नावाच्या मित्राविषयी माहिती मिळाली आणि कोंढवा पोलिसांचे खुनाच्या गुन्ह्याचे तपास चक्र फिरले.
सदर आरोपीचा शोध कसा घ्यावा याची कोंढवा पोलीस व्यूहरचना आखत होते तसेच यासाठी कसून चौकशी केली असता या गुन्ह्यातील आरोपी हे सोलापूर येथील असल्याची खातरजमा खबऱ्याकडून प्राप्त झाली .
कोंढवा पोलिसांची टीम कळमण, सोलापूर येथे पोहचली तेथील स्थानिक खबऱ्याकडून चौकशीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी श्री.योगेश सुधाकर कांबळे वय .२२ वर्षे रा. क्रांतीनगर ,गंगाखेड रोड ,जि.परभणी यास अटक केली. अटक केलेल्या संशयित आरोपीची कसून चौकशी केली मृत श्री.अक्षय गायकवाड उर्फ बंटी याचा व आपला शाब्दिक वादविवाद झाला ,याच वादविवादाचे रूपांतर हाणामारीत झाले व रागाच्या भरात सदर गुन्हा घडल्याचे संशयित आरोपी श्री.योगेश कांबळे यांनी पोलिसांकडे मान्य केले व त्यास चोवीस तासाच्या आत जेरबंद करण्यात कोंढवा पोलिसांनी यश मिळवले .
गुन्ह्याचा कोणताही पुरावा नसताना देखील कोंढवा पोलीस स्टेशनने पुन्हा एकदा “सदनिग्रहणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीद यशस्वी केले .

सदर गुन्ह्याचा शोध व धडक कामगिरी ही सुनील फलारी मा. अप्पर पोलीस आयुक्त ,पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांच्या सूचनेप्रमाणे मा. पोलिस आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर श्री .सुहास बावचे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्री. सुनील कलगुटकर ,कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मोरे पोलीस उपनिरीक्षक शिंदे सहाय्यक पोलीस फौजदार शेख आदीनी यशस्वीरित्या गुन्ह्याचा तपास केला .