एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल तर्फे वार्षिक कार्यक्रम ‘द क्वेस्ट’ चे आयोजन

783

एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल चे सल्लागार व मार्गदर्शक डेव्हिड इव्हान्स यांची एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल ला भेट

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल तर्फे वार्षिक कार्यक्रम ‘द क्वेस्ट’ आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे  वास्तविक जीवनातील समस्यांसाठी उपाय शोधण्याचे व्यासपीठ होते. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर संबंधित विविध विषयांवर अभ्यास करून केस स्टडीज सादर केले. या कार्यक्रमाकरिता  प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून  डेव्हिड इव्हान्स, खासदार, हाऊस ऑफ लॉर्ड्स, यूके आणि बेन इव्हान्स उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय आणि त्यांचे सादरीकरण यांचे डेव्हिड इव्हान्स यांनी खूप कौतुक केले. तसेच  विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधन आणि परिश्रमांबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एल्प्रो इंटरनॅशनल स्कुल चे सल्लागार व मार्गदर्शक डेव्हिड इव्हान्स शाळेच्या द क्वेस्ट या कार्यक्रमास उपस्थित राहणे ही शाळेसाठी अतिशय महत्वाची बाब आहे. डेव्हिड इव्हान्स सोबत दोन दिवसीय भेट विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी अतिशय समृद्ध असा अनुभव होता. युरोपियन राजकारणासमवेत आंतरराष्ट्रीय संबंध आणि व्यापाराविषयी तसेच युके मधील राजकीय परस्थिती यावर डेव्हिड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ब्रेक्झिट सारख्या वर्तमान विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कारकिर्दीमधील काही रोमांचक घडामोडी देखील सांगितल्या.

श्री डेव्हिड यांच्या सोबतचे हे सत्र विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची पर्वणीच होती. त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नही उत्साहाने उत्तरे दिलीत. यांच्या सोबत त्यांचा मुलगा बेन इव्हान्स देखील या कार्यक्रमास उपस्थित होते.

या प्रसंगी  “भारत, ब्रिटेन आणि कॉमनवेल्थ मधील व्यापार आणि विकासातील समन्वय” या चर्चा सत्राचेआयोजन करण्यात आले होते. डेव्हिड इव्हान्स यांच्या अध्यक्षतेखाली विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींनी यावर आपले विचार व्यक्त केलेत. याचर्चासत्रात रूपा चक्रवर्ती, दिल्लीच्या प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, ब्रिटीश ट्रेड ऑर्गनायझेशन, पुणे चे प्रमुख श्री. अवनीश मल्होत्रा आणि एल्कय केमिकल्सचे एमडी डॉ. रवींद्र कुलकर्णी, एल्प्रो इंटरनेशनल स्कूलच्या संचालक प्राचार्य डॉ. वोहरा यांनी भाग घेतला.  

याप्रसंगी बोलताना डेव्हिड इव्हान्स, खासदार, हाऊस ऑफ लॉर्ड्स, यूके म्हणाले, “एल्प्रो इंटरनॅशल स्कूल ला भेट देऊन मी आनंदित झालो आहे. येथील विद्यार्थ्यांचे कौशल्य व त्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षणाचा दर्जा बघून मी भारावून गेलो आहे. सर्व विद्यार्थी व एल्प्रो इंटरनॅशनल च्या टीम चे मी आभार मानतो व त्यांना पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देतो.”