महाराशिवरात्री निमित्त ब्रम्हमुहूर्त ज्ञानपीठ मोफत योग शिबिराचे आयोजन

978

कोंढवा प्रतिनिधी :

महाराशिवरात्री निमित्त कोंढवा येथील संकटहरण महादेव मंदिर परिसरात मा.नगरसेवक तानाजी लोणकर यांच्या वतीने २४ फेब्रुवारी ते १मार्च रोजी पहाटे ४ ते सकाळी ६ असे  मोफत योग शिबाराचे आयोजन केले आहे . आनंदी जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी  ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे  गुरुदेव श्री दिपकजी  यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या योग शिबिराचे आयोजन केले आहे.

  या योगशिबिरात श्रीगुरुदेव दिपकजी साधकांना अतिशय चांगल्या सोप्या पद्धतीने योग, ध्यानधारणा, संगीत आणि साधनेद्वारा आरोग्य कसे चांगले राहील याचे प्रशिक्षण देत आहेत. ह्या योगशिबिराला नागरिकांचा उत्फुरसपणे प्रतिसाद मिळत आहे. ताणतणाव, टाळून स्थिर मानसिकता टिकवण्यासाठी व निरोगी जीवनासाठी योगाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे .

 

ब्रम्हमुहूर्त  म्हणजे काय :-

24 तासात 30 मुहूर्त असतात. ब्रह्मा मुहूर्त हा रात्रीचा चौथा प्रहर आहे.  सूर्योदयाच्या अगोदर सकाळी दोन मुहूर्त आहेत. त्यापैकी पहिल्यास ब्रह्म मुहूर्त म्हणतात. दिवसा आणि रात्रीच्या 30 व्या भागाला मुहूर्त म्हणतात म्हणजे 2 तास किंवा 48 मिनिटांच्या कालखंडास  मुहूर्त म्हणतात. त्यानंतरची वेळ म्हणजे विष्णूची वेळ म्हणजे सकाळ सुरू होते, पण सूर्य दिसत नाही. आपल्या  घड्याळानुसार ब्रह्म मुहूर्त म्हणजे पहाटे 4.24 ते 5.12 वेळ.

 

ब्रह्मा मुहूर्तामध्ये काय करावे:

ब्रह्मा मुहूर्तामध्ये 4 कार्ये करावीत : १. संध्या वंदन, २. ध्यान, ३, प्रार्थना ४  अभ्यास करा. वैदिक पद्धतीने केलेले संध्या वंदन सर्वात योग्य आहे. मग पुन्हा प्रार्थना करा ध्यान करा. विद्यार्थ्यांनी संध्याकाळनंतर अभ्यास करावा, तसेच ब्रम्हमुहूर्त हा काळ अभ्यासासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. 

 

ब्रह्मा मुहूर्तामध्ये काय करू नयेः

नकारात्मक विचार, वादविवाद, संभाषण, लैंगिक संभोग, निद्रा, अन्न, प्रवास, कोणत्याही प्रकारचा आवाज इ. यावेळी बरेच लोक मोठ्याने आरती वगैरे पठण करतात असे दिसून आले आहे. काही हवन करतात, हे अयोग्य आहे.