कोंढवा प्रतिनिधी,
मा.नगरसेवक तानाजी लोणकर यांनी महाशिवरात्री निमित्त संकटहरण महादेव मंदिरात आयोजित केलेल्या मोफत योग शिबिराला कोंढवा तसेच पुणे परिसरातील नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांची योग साधनेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पहाटे चार ते सकाळी ६ अशा वेळेत योग साधना होत असून महिला तसेच पुरुष यांची योग साधनेसाठी मोठी गर्दी याठिकाणी होत असल्याचे पहायला मिळत आहे.
२६ फेब्रुवारी हा योग साधनेचा तिसरा दिवस असून ब्रम्हयोग योग ज्ञानपीठाचे श्री गुरुदेव महाराज हे साधकांना योग,प्राणायम ,झुंबा ,म्युझिक थेरपी, ध्यान धारणा चे प्रशिक्षण देत आहेत. गुरुदेव दीपक महाराज साधकांना आनंदी जीवन जगण्याची कला शिकवत असून हसत खेळत योग प्रशिक्षण साधकांना देत असून प्रत्येक आजारावर योग साधनेमुळे आपण मात करू शकतो असा विश्वास ते देतात. या वेळी आहार, नातेसंबंधांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शरीराबरोबरच मनाची ताकद कशाप्रकारे वाढवली पाहिजे याची माहिती श्री गुरुदेव महाराज यांनी दिली.
याप्रसंगी ब्रम्हयोग योग ज्ञानपीठाचे साधकांनी अत्यंत सूत्रबद्ध नियोजन केले आहे. गुरुमाऊली वैशाली मॅडम , अध्यक्ष शशिकांत आंनदास, अश्विनी पासलकर, सुधीर गरुड, विजय लोणकर हे नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. योग साधनेनंतर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रया येत असून आम्हाला बराचसा फरक जाणवू लागल्याचे नागरिक सांगत आहेत. रोजच्या जीवनात आहार आणि योग साधना करण्याचे आवाहन तानाजी लोणकर यांनी केले आहे.