डोंगरगाव तालुका सिल्लोड येथे सामाजिक कर्यकर्त्या विशाखा गायकवाड यांची भेट

217

पुणे प्रतिनिधी

डोंगरगाव येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली या घटनेची वृत्त पत्रात बातमी वाचली आणि त्या बातमीचा वृत्तात वाचून अक्षरशा मन सुन्न करणारी घटना घडली एका 30 वर्षीय महिला व तिची ७ वर्षीय
निरागस मुलीवर अमानुष अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आल्याचं संशय आहे अशा आशयाची बातमी होती
तेव्हा पासून पुणे येथील सामाजिक कर्यकर्त्या विशाखा गायकवाड यांनीअत्यन्त मनापासून या विषयाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला नेमकी सत्यता काय आहे ,हे जाणून घेण्या साठी त्यांनी थेट डोंगरगाव गाठून पीडित कुटूंबाची भेट घेतली व घटना स्थळाला भेट देऊन या संवेदनशील व गंभीर विषया संदर्भात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन संशयीत आरोपीला ताबडतोब अटक करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली तसेच संजीवनी संस्थेच्या माध्यमातून या घटनेचा पाठपुरावा करणार असून मयत महिलेच्या कुटूंबाला योग्यती मदत करणार असल्याच त्यांनी उपस्तीतांना सांगितलं ,अशा रणरागिणी ची समाजात गरज आहे कारण लिंग पिसाट विकृत मानसिकता असलेल्या लोकांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचं गावकऱ्यांनी आमचे प्रतिनिधी चंदू खरे याच्याशी बोलतांना सांगितलं यावेळी सुनीता ताई खंबायत, पवार ताई ,संजय भाऊ ईश्वर राऊत आदी उपस्थित होते