कोंढव्यात योग शिबीर उत्साहात संपन्न

1246

कोंढवा प्रतीनिधी

ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राच्या वतीने संकटहरण महादेव मंदिर येथे मा.नगरसेवक तानाजी मंदिर यांनी आयोजित केलेले सात दिवशीय मोफत योग शिबीर योगगुरु श्री दीपक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी नगरसेविका नंदा लोणकर, रुपालीताई धाडवे ,प्राची आल्हाट नगरसेवक तानाजी लोणकर, अजय खेडेकर , मेधा बाबर, तसेच डॉकटर ,वकील बिल्डर्स ,पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती प्रामुख्याने होती.


         योग गुरु दीपक महाराज यांनी आंनदी जीवन जगण्याची कला यावर मार्गदर्शन करून तसेच विविध योग प्रकार साध्या सोप्या पद्धतीने हसत खेळत शिकवले. ताणतणाव टाळून स्थिर मानसिकता टिकवण्यासाठी व निरोगी जीवनासाठी योगाचा अवलंब करावा, असे आवाहन योगगुरु दीपक महाराज यांनी केले.आरोग्यसंपदा तसेच विविध आजारावरील रामबाण उपाय व मनशांती, ऊर्जा व आनन्दाची अनुभूती मिळवण्यासाठी योगगुरू दीपक महाराज यांनी संगीतमय योगाचे प्रशिक्षण पुरुष, महिला , यवक युवती यांच्याकडून करून घेतले तसेच आवश्यक त्या सूचना देखील गुरुजींनी दिल्या.या योग शिबिराचा ८०० लोकांनी लाभ घेतला.योग शिबिर यशस्वी करण्यासाठी असंख्य साधकांनी निस्वार्थीपणे सेवा केली असून पहाटे दोन वाजता उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करत होते . गुरुमाऊली वैशाली मॅडम, शशिकांत आंनदास, अश्विनी पासलकर, सुधीर गरुड, विजय लोणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.