आनंद महिंद्रा यांचे सामाजिक भान; करोना ग्रस्तांसाठी भरीव मदत

1218

पुणे प्रतिनिधी,

करोना संकटावर मात करण्यासाठी मदतीची तयारी दाखवणारे देशातील पहिले उद्योगपती म्हणून आनंद महिंद्रा हे समोर आल्यानंतर सोशल मीडियातून त्यांचं कौतुक होत आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी आनंद महिंद्रा यांनी स्वतः चे एक महिन्याचा पगार तसेच Mahindra Holidays चे रिसॉर्ट्स क्वारटाईन साठी तसेच तात्पुरते रुग्णालय उभारण्यासाठी देण्याचे सांगितले आहे.

“तज्ज्ञांनुसार भारत करोना संकटाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचलाय किंवा तिसऱ्या टप्प्याच्या अगदी दारात उभा आहे…त्यामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत काही पटीने वाढ होण्याची शक्यता आहे…काही आठवडे लॉकडाउन हाच उत्तम पर्याय आहे…त्यामुळे वैद्यकीय सेवेवरील दबावही थोडा कमी होईल. पण, आपल्याला अजून बरीच तात्पुरती रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याकडे व्हेंटिलेटरची कमतरता आहे. त्यामुळे आमच्या उत्पादन सुविधांद्वारे  ( manufacturing facilities)व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी काय करावं लागेल यावर महिंद्रा ग्रुप तातडीने काम सुरु करेल… आम्ही तात्पुरती काळजी सुविधा केंद्र म्हणून आमच्या महिंद्रा हॉलिडेजचे रिसॉर्ट्स ऑफर करण्यास तयार आहोत…आमची प्रोजेक्ट टीम तात्पुरती काळजी सुविधा केंद्र उभारण्यात शासन  सैन्यदलास मदत करण्यास तयार आहे.तसेच आम्ही करोनामुळे फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या मदतीसाठी निधी उभारणार असून, त्यात मी माझे १०० टक्के वेतन मदत म्हणून देईल, तसेच आम्ही आमच्या सहयोगींनाही या निधीमध्ये स्वेच्छेने योगदान देण्यास प्रोत्साहित करू” असे जाहीर केले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सौजन्यलोकसत्ता