‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारा : अजित पवार

603

पुणे प्रतिनिधी,

‘कोरोनो’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा, कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर येऊ नये, गर्दी टाळावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री पवारयांनी केलं आहे. देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतरचा आनंद साजरा करण्यासाठी या गुढीपाडव्याचा उत्साह राखून ठेवावा, असंही अजित पवार म्हणाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीला नागरिकही मोठा प्रतिसाद देत आहेत. मात्र, उद्या 25 मार्चला गुढीपाडवा मराठी नववर्ष आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा हा नागरिकांना सामुहिकरित्या साजरा करता येणार नाही. मात्र, हा उत्साह राखून ठेवा, देशावरचा ‘कोरोना’चा धोका पूर्णपणे संपल्यानंतर आनंद साजरा करु, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे..

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सौजन्यटीव्ही९