कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोंढव्यातील तरुणांचा एक आगळावेगळा उपक्रम

923

गणेश जाधव,प्रतिनिधी

कोरोना विषाणूने जगभर थैमान माजवले असता, आज प्रत्येक जण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे याचाच काहीसा अनुभव पुण्यातील कोंढवा खुर्द येथे पाहण्यास मिळाला.

कोंढवा खुर्दच्या ग्रामस्थांनी ,रहिवाशांनी तसेच तरुण वर्गांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एक आगळीवेगळी शक्कल लढवली आहे.गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकास हटकवले जात असून त्यांस कोरोना विषाणू बद्दल योग्य ती माहिती देऊन स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत .

गावाच्या बाहेर वेशीवर ,गल्लोगल्ली ,चौकाचौकात फलक लावून करोना विषाणूसंदर्भात मार्गदर्शन केली जात आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला हात धुण्यासाठी पाणी,साबण तसेच सॅनीटायझर ची व्यवस्था केलेली पाहायला मिळणार आहे .

बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकास हात धुण्यास व स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यास तरुण वर्गाकडून सांगण्यात येत आहे .गावातील चौकाचौकात बॅरिकेट्स लावून याबाबतच्या सूचना वारंवार सांगण्यात येत आहेत. राज्य शासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यांना स्थानिकांनी सहकार्य करण्याचे आव्हान देखील तरुण वर्गाकडून करण्यात येत आहे .

राज्यात लागलेल्या कलम 144 अनन्वय “संचारबंदी व जमावबंदी “आदेशाचे पालन कराव्याबाबतच्या सूचना देखील देण्यात येत आहेत. “संचारबंदी व जमावबंदी” यासंदर्भात आपण एक सुजाण नागरिक म्हणून पोलीस प्रशासनास योग्य ते सहकार्य करण्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांना ,नागरिकांना वारंवार सूचना करण्यात येत आहेत. चौकाचौकात ,गल्लोगल्ली यासंदर्भात फलक लावून लोकांना जाहीर आव्हान करण्यात येत आहे.

करोना विषाणूबद्दलची जनजागृती करून समाज प्रबोधन करण्याचे उत्तम कार्य युवक वर्गातून होत असल्याचे पाहून सर्व वर्गातून या कामाची नोंद घेतली जात आहे. तरुण वर्गाचा हा सहभाग पाहून सर्व नागरिकांमध्ये एकजुटीचा संदेश दिल्याचे देखील पाहण्यास मिळाले.