माणसाला माणूस बनवण्यासाठी आलाय कोरोना

604

गिरीश भोपी, पनवेेेल

‌भारतासह जगभरात कोरोनान थैमान घातलं आहे. शंभरहून अधिक देशात कोरोनाने शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात शंभरहून जास्त रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यावर नियंत्रण म्हणून २१ दिवस लॉकडाऊन भारत सरकारने घेतला आहे. आणि त्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत ती म्हणजे पोलिस यंत्रणा. त्यामुळेच प्रत्येक जण स्वतची स्वतःची काळजी घेत, सामजिक बांधिलकी जपत आहेत. आणि सर्वजण घरात बसून आपापला बचाव करत आहेत… पोलिस मात्र प्रामाणिकपणे आपली नोकरी करीत आहेत.. पोलिसांनीच का करावी नोकरी? लोक हुज्जत घालतात.. शिवीगाळ करतात.. आणि आता मारहाण पण करतायत.. कोणासाठी ते अशा भितीदायक परिस्थितीत नोकरी करतायत.. त्यांना नाहीये का कोरोनाची भीती? अशा परिस्थितीत सुद्धा ज्यांना घर नाही, खाण्या पिण्याची सोय नाही, अशा लोकांसाठी मात्र पोलिस आपले कर्तव्य बजावून, त्या लोकांसाठी खाण्या पिण्याची व्यवस्था करत आहेत त्यामुळे जे लोक निराधार, बेघर आहेत ,भिक्षेकरी आहेत त्यांचा तात्पुरता अन्नाचा प्रश्न मिटला असेच म्हणावे लागेल.🇮🇳🇮🇳