“वर्दी मधल्या दैवतांची सुरक्षितता”….

748

गणेश जाधव, मुंबई

साकीनाका विभागाअंतर्गत असलेल्या ९० फिट पोलीस चौकी येथील पोलिस कर्तव्य असलेले पोलीस कर्मचारी यास गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्ताकरिता संचार करावा लागत आहे इतर अनेक लोकांची वेगवेगळ्या कारणाने भेटीगाठी होत असता त्यांच्याकडे आरोग्य संबंधित कोणत्याही प्रकारचे मास्क किंवा सॅनिटायजर नसल्याचे जाणवले अशा कठीण प्रसंगात देखील आपल्या “जीवाचे रान करणारे व इतरांना घरात राहण्याचा बहुमोल सल्ला देणारे “आपले पोलीस कर्मचारी यांची काळजी घेण्याचा सार्थ विचार सामाजिक कार्यकर्ते “विकास शेळके ” यांनी आणला.

त्या अनुषंगाने विकास शेळके यांनी आपल्या स्वखर्चाने मास्क ,सॅनीटायजर ,हॅन्ड ग्लोज देण्याचे योजले .त्याप्रमाणे त्यांनी आज त्यांच्या मित्र परिवारासोबत ९० फिट पोलिस चौकीला भेट दिली असता ,सदर उपक्रमांतर्गत मास्क,
सॅनी टायजर, हॅन्ड ग्लोज वाटप केले व पोलीस बांधवांचे आभार देखील व्यक्त केले ..

या उपक्रमात विकासदादा शेळके ,गणेश जाधव सर, इंद्रकुमार विश्वकर्मा सर अजय रजक, संदीप येजरे उपस्थित होते.. त्यासोबत स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील सदर कार्याचे आभार मानले आणि अशीच सेवा घडत राहो ही अपेक्षा व्यक्त केली..