तीर्थक्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर अन्नदान उपक्रमास प्रारंभ

848

कोरोनाचे पार्शवभूमीवर गरजूंसाठी योजना

आळंदी प्रतिनिधी, पुणे

तीर्थक्षेत्र आळंदीत कोरोनाचे पार्शवभूमीवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे आळंदीत अडकलेले कामगार,प्रवासी,बेघर,रोजंदारीचा अभाव,घरी जाता न आलेले कामगार आणि या परिस्थितीत रोजगार नसल्याने खाण्या पिण्याची तसेच निवा-याची सोय नसल्याने इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा फिरणा-यांची संख्या मोठी आहे. या सर्वानाच अन्नदानाची सोय करण्यासाठी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी पुढाकार घेऊन इंद्रायणी नदी घाटावर व आवश्यक ठिकाणी जाऊन अन्नदान सेवा सुरु केली.
आळंदीत रोजगार बंद झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील झोपडीधारकांना अन्नदान करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी इंद्रायणी नदी घाटावर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर,माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, सभापती सागर बोरुंदीया,नगरसेविका सुनीता रंधवे,रुख्मिणी कांबळे,नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे,गणेश रहाणे, मंडलाधिकारी चेतन चासकर,गटनेते पांडुरंग वहिले,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष आकाश जोशी,कर निरीक्षक रामराव खरात, अधीक्षक किशोर तरकासे,विजय गावडे,आदींचे उपस्थितीत व मार्गदर्शनात अन्नदान वाटप करण्यात आले.

आळंदीत कोणी उपाशी पोटी राहू देणार नाही :- नगराध्यक्षा उमरगेकर
आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात रोजगारास आलेल्या कुटुंबीयांचा रोजगार बंद झाला आहे. यात अनेक सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबाना लॉकडाऊन च्या पार्शवभूमीवर पोटभर जेवणाची व्यवस्था नसल्याने या अन्नदान सेवेने त्यांना पोटभर जेवणाची सोय झाली. यासाठी आळंदी नगरपरिषदेने विशेष पुढाकार घेऊन प्रथम नागरिक नगराध्यक्षा वैजयंता उमगेकर यांचे प्रयत्नातून इंद्रायणी नदी घाटासह आवश्यक त्या ठिकाणी अन्नदान सेवा देण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी आळंदीकर ग्रामस्थ,व्यापारी,नागरिक व स्वयंसेवी संस्थानी अन्नदान सेवेस हातभार लावण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

एक हात मदतीचा अन्न साहित्य वस्तू दान मोहिमेस प्रारंभ  
या लॉकडाउन ची परिस्थिती निवळे पर्यंत आळंदीत अन्नदान सेवा सुरु राहणार आहे. यासाठी स्थानिक नागरिक,व्यापारी,दानशूर व्यक्ती, संस्था यांनी आळंदीतील ज्ञानदर्शन धर्मशाळा भैरवनाथ चौक येथे किराणा साहित्य अन्नदानासाठी वस्तुरूपी मदत व सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे. आळंदी शहर आणि परिसरात उपाशी पोटी कोणीही राहू नये यासाठी आळंदीत एक हात मदतीचा मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्वानी आपले योगदान देऊन कोरोना या संकटावर मात करून गोरगरिबांची अन्नदान रूपातून सेवा करण्यास नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी आवाहन केले आहे. आळंदीत कोणी उपाशी पोटी राहू देणार नाही सर्व गरजूना अन्नदान सेवेचा लाभ दिला जाईल असे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी सांगितले.
आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या नदी घाटावरील लोकांचा सर्व्हे देखील आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी समीर भूमकर व मंडलाधिकारी चेतन चासकर यांचे माध्यमातून सुरु असून गावी जाणा-यांची यादी तयार केली जात असल्याचे कर निरीक्षक रामराव खरात यांनी सांगितले.
लवकरच गरजूना कोरडा शिधा वाटप करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांनी दिली. आपापल्या घरी निघालेल्या मात्र लॉक डाउन मुळे आळंदीत अडकलेल्या तसेच गरजूना भोजन व्यवस्था केली जात आहे. अशा गरजूंची तसेच कुटुंबीयांना आपण काही मदत करू इच्छित असल्यास आळंदीतील ज्ञानदर्शन दर्शन धर्मशाळेत संपर्क करण्याचे आवाहन नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केले आहे. तसेच अशी कुटुंब आणि गरजू असल्यास त्यांची नावे कळवावीत असे त्यांनी सांगितले.