आळंदी येथे मोफत माक्स वाटप

555
अर्जुन मेदनकर ,आळंदी 
 श्रीक्षेत्र आळंदी येथे भैरवनाथ नागरी  पतसंस्थेच्या वतीने भाविक भक्तांना व पतसंस्थेत आलेल्या ग्राहकांना करोना व्हायरस संर्सजन्य प्रतिबंधक  विषाणू साथ नियत्रंक अंतर्गत सर्तकतेचा इशारा देऊन नागरिकांनी घाबरून जावू नये व शासनाच्या आदेशाचे पालन करावे आणि आजाराची लक्षणे शासकीय रूग्णालय आणि टोल फ्री नंबरवर संर्पक साधावा असा संदेश पुणे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राम गावडे यांनी दिला.
 याप्रसंगी आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र चौधर यांच्या हस्ते भाविकांना मोफत माक्स वाटप करण्यात आले यावेळी  भैरवनाथ नागरी पतसंस्थेचे उपाअध्यक्ष राम गावडे शहर प्रमुख  रोहिदास तापकीर चेतन कबीर शाम गावडे दिनेश कदम समीर घुडंरे दत्ता तापकीर गणेश शेळके बालाजी शिंदे प्रसाद दिनळ पारखताई व आदि मान्यवर उपस्थित होते.