तळोज्यात गरजूंना सोमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने अन्नदान

682

शशिकांत दळवी, पनवेल

देशभर कोरोनाने थैमान घातले असुन महाराष्ट्रात सुध्दा कोरोनाची रुग्नाची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या तलोजा पापडीचापाडा येथील आदीवासी वाड्यातील गोर गरीबांना अन्न मिळत नव्हते. या आदिवासी बांधवांना रोज दोन वेळचं जेवण गणेशजी नाईक यांचे समर्थक  प्रल्हादभगवान गायकर यांच्या तर्फे अन्न दान करुन शासनाला सहकार्य केले.

खारघर परिसरात सेक्टर १० व ११ बेळपाडा गाव व आजुबाजूच्या आदीवासी वाड्यांना व येथे काही परराज्यातील नागरिक अडकल्याचे समजताच त्यांना सोमेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने पापडीचापाडा यांच्या पुढाकारांने शासनाला सहकार्य म्हणुन रोज दिवसाला २०० पाकीटे पुलावभात व चपाती भाजी देण्याचे काम गेले सहा सात दिवस व आज पर्यत चालु आहे व पुढील काही दिवस लॉक डाऊन असे पर्यत ही सेवा सोमेश्र्वर मंदीर ट्रस्ट आमच्या तर्फे देण्याचे काम करु असे ट्रस्टचे पदाधिकारी श्री प्रल्हाद गायकर यांनी सांगण्यात आले व आम्हीपण देशाचे नागरिक आहोत देशासाठी आम्हाला सुध्दा सेवा करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य समजतो असे सोमेश्र्वर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.