पुणे विभागात 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची आवक ;विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

530

पुणे प्रतिनिधी

पुणे विभागात अंदाजे 28 हजार 936 क्विंटल अन्नधान्याची मार्केटमध्ये आवक झाली आहे. विभागात भाजीपाल्याची आवक 9 हजार 901 क्विंटल, फळांची आवक 4 हजार 431 क्विंटल तसेच कांदा-बटाटयाची आवक 9 हजार 168 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 3 एप्रिल 2020 रोजी 101.84 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 25.70 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

 

पुणे विभागात 62 हजार 736 स्थलांतरित मजुरांसाठी 671 रिलीफ कॅम्प
1 लाख 17 हजार मजुरांची भोजनाची व्यवस्था
डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती

पुणे, दि.४: सध्याच्या लॉक डाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी पुणे विभागात 671 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यातील जिल्हा प्रशासनामार्फत 109 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 562 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये 62 हजार 736 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 17 हजार 16 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागातील गरजू तसेच रोजंदारीवर असलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांकडून तसेच दानशूर व्यक्तींकडून दहा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत. या किटमध्ये गव्हाचे पिठ व तांदूळ प्रत्येकी पाच किलो, डाळ, तेल, साखर, मीठ प्रत्येकी 1 किलो, हळद 100 ग्रॅम, तिखट 250 ग्रॅम, अंगाचा साबण व कपड्याचा साबण प्रत्येकी 1 वडी या 10 वस्तूंचा समावेश या किटमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.
000000

7 एप्रिलचा लोकशाही दिन रद्द -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे

पुणे, दि.4 : भारतासह संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाची साथ पसरत असून महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्हयातही या रोगाची साथ पसरलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. पंतप्रमाधन मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशान्वये आजाराचा प्रसार हावू नये यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले असून दिनांक 14 एप्रिल पर्यंत देशात संचारबंदीचे आदेश जाहीर करण्यात आलेले आहे. रोगाच्या प्रसाराची स्थिती लक्षात घेता दिनांक 7 एप्रिल 2020 रोजी दुपारी 1 वाजता होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असून पुढील लोकशाही दिनाची वेळ व दिनांक कळविण्यात येईल, असेही प्रसिध्दी पत्रकान्वये निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी कळविले आहे.
००००

संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे
-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे, दि.४ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

डॉक्टर्स रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यांच्यासाठी एन 95 व सर्जिकल मास्क तसेच त्या अनुषंगीक साहित्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अडकलेल्या मजुरांसाठी अन्नधान्याची सुध्दा आवश्यकता आहे. त्यासाठी उद्योजक, व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आदीं दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. साहित्य स्वरुपात ही मदत करावी, ही मदत करतांना सोशल डिस्टन्स ठेवण्‍यात यावा तसेच मदत द्यायला जास्त लोकांनी येवू नये, तीन-चार लोकांनीच यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीत https://cmrf.maharashtra.gov.in/CMRFCitizen/index.action या वेबसाईटवरुनही मदत करता येईल, असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचा धनादेश विभागीय आयुक्त कार्यालयातही जमा करता येऊ शकतो.

कोविड -19 (कोरोना व्हायरस) या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संस्था व विविध कंपन्या – सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट, ग्लोव्हज, फेस मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- 95 मास्क, सॅनिटायझर, गॉगल, शु कव्हर, गम बूट, सोडियम हायपोक्लोराईट 5 टक्के द्रावण, फेस शिल्ड, व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजन सिलेंडर्स, पल्स ऑक्सिमीटर, मल्टी पॅरा मॉनिटर्स अशा वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागांस गरज असल्याने पुणे विभागातील 5 जिल्ह्यांतील मदत करणाऱ्या इच्छुकांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन एका पत्रकान्वये केले आहे. याकरीता डॉ. संजय देशमुख-मो.नं- 9422033439, डॉ. नंदा ढवळे- मो. नं- 9822428560, श्रीमती गौरी पिसे- मो.नं- 9890408987, श्री. गिरीश कु-हाडे- मो.नं- 7798981199 भ्रमणध्वनीवर क्रमांकावर संपर्क साधता येईल.

पुणे विभागातील अन्नधान्य दान करणाऱ्या इच्छुकांनी पुणे जिल्हा श्री. भानुदास गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी 020-26061013, श्रीमती अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 020-26123743, सातारा जिल्हा श्रीमती स्नेहल किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 02162-234840, सांगली जिल्हा 1) श्रीमती वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी 0233-2600512, कोल्हापूर जिल्हा श्री. दत्तात्रय कवितके जिल्हा पुरवठा अधिकारी 0231- 265579, सोलापूर जिल्हा श्री उत्तम पाटील जिल्हा पुरवठा अधिकारी 0217-2731003 यांच्याशी संपर्क साधावा किंवा ईमेल कळविण्याचे आवाहन केले आहे.
0000