‘येवले अमृततुल्य’तर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत…

477

कोरोनाविरुद्ध लढणा-यांना ‘येवले अमृततुल्य’तर्फे तरतरी देण्याचे काम…कोरोनाशी लढायला “येवले परिवार” सरसावला…

पुणे प्रतिनिधी

पुणे, दि. 4 एप्रिल: करोना विषाणूने संपूर्ण जगासमोर आव्हान निर्माण केले आहे. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला असला तरी करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून येवले अमृततुल्य यांच्या कडून मुख्यमंत्री सहायता निधीला आर्थिक तब्बल पाच लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, गणेश येवले, निलेश येवले, मंगेश येवले, तेजस येवले तसेच संजय येवले निलेश मोरे उपस्थित होते.

तसेच येवले अमृततुल्य संचलित “येवले फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेद्वारे करोना विषाणू च्या पार्श्वभूमी वर आस्करवाडी व भिवरी या ठिकाणी 2000 मास्क व सॅनिटाईझर चे वाटप केले गेले. कोरोनो व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही मदत करत आहे. परंतु,सध्या या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करणाऱ्या साधनांचा तुटवडा जाणवत आहे. याच हेतूने येवले फांऊडेशनच्या वतीने पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी व भिवरी या संपुर्ण गावकरी, कोरोनाशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच पोलिसांना मास्क तसेच सॅनिटायझरचे मोफत वाटप केले गेले. तसेच संपुर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्तीत लढणाऱ्या या सर्व मंडळींना मोफत येवले अमृततुल्य चहा देण्याचे काम सुरू आहे. मनानं आणि शरीरानं थकलेल्या या जीवांना तेवढीच तरतरी यावी आणि त्यांच्या कामात आपलाही खारीचा वाटा असावा, एवढाच यामागे उद्देश असल्याचे येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले म्हणाले.

——————————–