आळंदीत नरसिव्ह स्वामी महाराज मंदीरात शिंदेशाही उटी

859
अर्जुन मेदनकर,आळंदी
तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री नार्सिव्ह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदिरातील दीडशे वर्षांची चंदनउटीची परंपरा क्षेत्रोपाध्ये पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी परिवाराने रामनवमी दिनी ही कायम ठेवत श्रींचे संजीवन समाधीवर राजबिंडे शिंदेशाही रूप चंदन उटीतून साकारले.
 आळंदी मंदिरातील प्रथापरंपरांचे पालन करीत फक्त धार्मिक पूजा विधी नित्यनैमित्तिक उपचा कोरोनाचे पार्शवभूमीवर केले जात आहेत. आळंदीतील सर्व मंदिरे भाविकांचे साठी दर्शनास बंद आहेत.
 आळंदीत यामुळे यावर्षीचा राम जन्मोत्सव सोहळा रद्द करण्यात आला आहे. केवळ पूजा परंपरेने करण्यात आली. येथील आवेकर भावे श्री राम मंदिर संस्थान ने ही  सध्या पद्धतीने राम नवमी साजरी केली.यावेळी भक्तांशिवाय उत्सव साजरा झाला. श्रींचे पादुकांचे माउली मंदिरात प्रदक्षिणा व माउली भेट झाली.यावेळी विश्वस्त नरहरी महाराज चौधरी,श्रींचे पुजारी कुलकर्णी,लक्ष्मण मेदनकर उपस्थित होते. माउली देवस्थान तर्फे माउली वीर यांनी स्वागत केले. माउली मंदिरात देखील यावर्षी लॉक डाउन मुळे चंदन उटी रद्द करण्यात आली. भाविकांना मंदिर दर्शनास बंद ठेवण्यात आले आहे.
 आळंदीत लॉक डाउन मध्ये अडकून पडलेल्या तसेच गरजूना अन्नदान सेवा उद्योजक नकुल म्हस्के,सिद्धार्थ म्हस्के यांचे माध्यमातून रुजू झाली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष रामदास भोसले,माजी नगरसेवक अशोक उमार्गेकर,आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त स्वामी सुभाष महाराज ,उद्योजक अविनाश बोरुंदीया आदींचे हस्ते वाटप व अन्नदान सेवेचा टेम्पो रवाना करण्यात आला.
आळंदीत लॉक डाउन काळात आढळलेल्यांवर कारवाई ; रस्ते निर्मनुष्य  
आळंदी शहर व ग्रामीण परिसरात आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर ,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव,गुप्त वार्ताचे मच्छिन्द्र शेंडे यांचे माध्यमातून प्रभावी पोलीस बंदोबस्त थिठिकाणी तैनात करण्यात आला आहे. विविध रस्त्यावर चौकात पोलिसांची कुमक असून विनाकारण फिरणाऱ्यावर कडक कारवाई केली जात आहे. अत्यावश्यक सेवेची वाहने वगळता इतर वाहनांवर कारवाई केली जात आहे. कोणीही विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन आळंदी पोलिसांनी केले आहे. येथील मरकळ चौकात अनेक वाहनावर कारवाई करण्यात आली.वाहन चालकांची विचारपूस करण्यात येत असल्याने वाहन चालकही आता रस्त्यावर येण्यास कचरत आहेत. यामुळे वाहने आता रस्त्यावर दिसत नसल्याने आळंदी पोलिसांचे कार्यवाही ला जनजागृतीला तसेच लावण्यात आलेल्या बंदोबस्ताला यश मिळत आहे.